महाराष्ट्र दिनी पाणपोईचा शुभारंभ - अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार


उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचा पुढाकार


गडचिरोली,
पाणी हे जीवन आहे. तहानलेल्याला घोटभर पाणी पिऊ घालणे ही आपली संस्कृती आहे. उन्हाळ्याच्या तप्त उन्हात रस्त्याने जाता- येता घशाला पडलेली कोरड दूर करताना चार घोट गार पाणी घशाखाली उतरले की हायसे वाटते. गडचिरोली शहरात चामोर्शी मार्गावर शाळेकरी विद्यार्थी व नागरिकांची मोठी वर्दळ असते. या मार्गावर अनेक खाजगी दवाखाने सुध्दा आहेत. ग्रामीण भागातील नागरिक विविध कामासाठी शहरात येतात. उन्हाळ्याच्या दिवसात वाटसरुंना शुध्द व थंड पाणी मिळावे या हेतूने जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असलेले उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालया समोर पाणपोईची सुविधा निर्माण केली असून आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पाणपोईचा श्रीगणेशा करण्यात आला.
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची मोठी भीषण समस्या असते. रस्त्याने फिरताना तहानलेली व्यक्ती पाणपोई दिसली की पाणपोईकडे धाव घेते. आपसूकच क्षणभर विश्रांती घेऊन चार घोट पाणी घशाखाली उतरविल्यानंतर मनाला शांती व गारवा मिळतो. चामोर्शी मार्गावरील अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालय परिसरात खाजगी रूग्णालये आहेत. ट्युशन क्लॉसेस घेणाऱ्या संस्था तसेच जवळच राज्य परिवहन महामंडळाच्या बसथांबा आहेत. त्यामुळे रस्त्याने येजा करणारे नागरिक, प्रवाशी आणि शाळेकरी व टयुशन क्लॉसेसेच विद्यार्थी यांची संख्या मोठी असते. या सर्वांना पिण्याचे थंड पाणी मिळावे म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी पाणपोई सुरू केली आहे. त्यामुळे चामोर्शी मार्गावरील तहाणलेल्या वाटसरूंना दिलासा मिळणार आहे.
या पाणपोई शुभारंभ प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार, उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, विभाग प्रमुख अमित बानबले, नवनाथ उके, संदिप भुरसे, संदिप आलबनकर, विभाग प्रमुख गणेश ठाकुर, उपविभाग प्रमुख संजय बोबाटे, देवेंद्र मुळे, रमाकांत चिंचोलकर, ओमप्रकाश मडावी, जयकुमार खेडेकर, विकास उंदिरवाडे, जगन चापले, दिपक लाडे, सुरज ऊईके, निरंजन लोहंबरे, रविंद्र निसार, ओमाजी भैसारे, दिलीप चनेकार, अंबादास मुनघाटे, निकेश लोहंबरे, राहुल सोरते, तुषार बोरकर, उमाकांत हर्षे, चंद्रहास म्हस्के, सुधीर सिडाम, पवन हर्षे, दिलीप वलादे, अमर निंबोड, सचिन मडावी, युवराज खेवले, विलास उंदिरवाडे, हळुहळु बारापात्रे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments