मार्कंडादेव मंदिर समुहातील मुख्य मंदिराचे जिर्णोद्धारच्या कामाला लवकरच सुरवात होणार - खासदार अशोक नेते

मार्कंडादेव मंदिर समुहातील मुख्य मंदिराचे जिर्णोद्धारच्या कामाला लवकरच सुरवात होणार- खासदार अशोक नेते


गडचिरोली,
खासदार अशोक जी नेते यांनी घेतली भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपुर चे अधिक्षक अरुन मलीक यांची रविभवन नागपुर ला भेट घेत दरम्यान मार्कंडा देवस्थान संबंधित विविध सोयी सुविधा उपलब्ध भाविक भक्तांना व्हाव्या याकरिता संबंधित चर्चा करण्यात आली.
मार्कंडादेव/गडचिरोली:- विदर्भाची काशी म्हणुन ओळखल्या जाणारे पवित्र तिर्थक्षेत्र मार्कंडादेव येथील मंदिर समुहातील मुख्य मंदिराचे जिर्णोद्धाराचे बांधकाम गेल्या अनेक दिवसापासून बंद स्थीतीत आहे ते बांधकाम तात्काळ सुरु करावे या संबधाने गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज नागपुर येथील रविभवनात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपुर चे अधिक्षक अरुन मलीक यांच्याशी भेट घेऊन दिशा निर्देश दिले आहे सोबत मंदिरात येणाऱ्या भाविक भक्त,पर्यटक याच्या करीता मुलभूत सोयीसुविधा सुद्धा ऊपलब्ध करुन द्यावे अशी मागणी सुद्धा खासदार अशोक नेते यांनी केली असुन अगदी काही दिवसातच मार्कंडादेव मंदिर समुहातील मुख्य मंदिराचे बांधकाम सुरु करणार अशी ग्वाही भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपुर चे अधिक्षक अरुन मलीक यांनी खासदार अशोक नेते यांना दिले आहे.

Post a Comment

0 Comments