मार्कंडादेव येथे महर्षी मार्कंडेय शिव मुर्तीचा स्थापना दिवस
मार्कंडादेव:- विदर्भाची काशी म्हणुन नावालौकीकास असलेल्या चामोर्शी तालुक्यातील तिर्थनगरी असलेल्या मार्कंडादेव येथे जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या महर्षी मार्कंडेय शिव मुर्तीचा स्थापना दिवस 15 सप्टेंबर ला रोज रविवारी साजरा करण्यात येणार आहे.यावेळी महर्षी मार्कंडेय शिव भगवान ची पुजा अर्चना होम हवन विधीवत होणार असुन सामाजिक कार्यकर्ते डॉं रविंद्र सुरपाम भार्या सौ जयश्री सुरपाम , सामाजीक कार्यकर्ते छबिलदास सुरपाम सपत्नीक यांच्या हस्ते पुजा संपन्न होणार आहे त्यासोबतच भावीक भक्ताकरीता डॉं रविंद्र नारायन सुरपाम सुरपाम मित्र परिवारातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी भावीक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे आव्हान जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान चे मठाधिपती आचार्यंश्री श्रीमंत संतोष सुरपाम यांनी केले आहे अशी माहीती संस्थान चे उपाध्यक्ष रत्ना गोकुलदास गेडाम सदस्य मंजुळा वेलादी,वर्षा भाजीपाले यांनी कळविले आहे
0 Comments