जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अपघाताग्रस्ताला आर्थिक मदत.

जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अपघाताग्रस्ताला आर्थिक मदत.

 वेलगुर टोल्यानजीक झाला होता अपघात.
अहेरी,
अहेरी तालुक्यातील वेलगुर टोला नजीकच्या वळणावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.अपघातातील दोघेही मृतक हे गडचिरोली जिल्हा बाहेरील असल्याने त्यांचे मृतदेह स्वगावी पोहचविण्याकरिता जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत केली.माजी जि.प.अध्यक्ष हे जनमान्यांशी आपली नाळ जुळवून आहेत. आतापर्यंतच्या कालावधीत अनेकांना मदतीचा हात पुढर करत मदत पोहचवली आहे. त्यांच्या या कार्याने नागरिकही प्रशंसा करतांना दिसतात. अहेरी तालुक्यातील वेलगुर टोला नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. सदर बाब जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कानाशी येताच व मृतक हे गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेरील असल्याचे लक्षात येताच मृतदेह स्वगृही पोहचवण्याकरीता मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत केली.

Post a Comment

0 Comments