आरमोरी तालुक्यातील एका महिलेच्या घरातच चक्क सुगंधित तंबाखूचा कारखाना

आरमोरी तालुक्यातील एका महिलेच्या घरातच चक्क सुगंधित तंबाखूचा कारखाना

महाराष्ट्र राज्याने प्रतिबंधित केलेल्या सु्गंधित तंबाखुचे उत्पादन करीता लावलेल्या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

 घटनास्थळावरुन एकूण 07,84,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त 
गडचिरोली,
महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू उत्पादन, विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध केला आहे. गडचिरोली जिल्ह्रात देखील सुगंधित तंबाखूचे उत्पादन, विक्री व वाहतूक करणा­यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी गडचिरोली जिल्ह्रातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारु, जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली आहे.
काल दिनांक 02/09/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, 15 दिवसांपूर्वी मौजा डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली येथील सौ. रेखाबाई सडमाके यांचे राहते घरी आरोपी नामे ओमप्रकाश गेडाम, रा. डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली व इतर चार इसम यांनी मशिनच्या सहाय्याने सुगंधित तंबाखूचे उत्पादन करण्याकरीता अवैध कारखाना सुरु केला होता. अशी सदर खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक मौजा डार्ली येथे रवाना झाले. गोपनिय माहितीमध्ये नमूद महिला नामे सौ. रेखाबाई सडमाके, वय 42 वर्षे, रा. डार्ली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली यांचे घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन पोलीस पथकाने त्याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्या घरामध्ये सुगंधित तंबाखूने भरलेल्या टिनाच्या डब्यांचे विविध बॉक्स व सुगंधीत तंबाखूचे उत्पादन करण्याकरीता आवश्यक असणारे साहित्य मिळून आले. सदर सर्व सुगंधीत तंबाखू व साहित्य जप्त करण्यात आले असून त्यामध्ये खालीलप्रमाणे साहित्य मिळून आले आहे.
 02 राखडी खरड¬ाच्या बॉक्समध्ये 65 नग मजा 108 हुक्का शिश तंबाखू कंपनिचे भरलेले 200 ग्रॅम वजनाचे टिनाचे डब्बे, प्रति डब्बा अवैध विक्री किंमत 2,000/- प्रमाणे एकूण 1,30,000/- रुपये.
 मजा 108 हुक्का – शिशा तंबाखू कंपनिचे 10 खरड¬ाचे बॉक्स, प्रत्येकी बॉक्समध्ये 50 ग्रॅम वजनाचे 10 नग टिनाचे डब्बे, असे एकूण 100 नग टिनाचे डब्बे, अवैध विक्री किंमत – 300/- रु. प्रमाणे एकूण किंमत – 30,000/- रुपये.
पंाढ­या रंगाच्या चंुगळीमध्ये कच्चा तंबाखू असलेले 24 नग चुंगळी, प्रत्येकी चंुगळीमध्ये 03 कि.ग्रॅ. वजनाचे 96 प्लास्टीक असे एकूण 288 कि.ग्रॅ. - अवैध विक्री किंमत – 1000/- रु. प्रमाणे एकूण किंमत – 2,88,000/- रुपये.
 निळ्या रंगाची 200 ग्रॅम वजनाचा मजा 108 हुक्का शिशा तंबाखू पॅकींग करण्याची लोखंडी मशिन - अंदाजे किंमत 80,000/- रुपये
 50 ग्रॅम वजनाचा मजा 108 हुक्का शिशा तंबाखू टिनाचा डब्बा पॅकींग करण्याची इलेक्ट्रीक मोटर असलेली लोखंडी मशिन, अंदाजे किंमत – 1,10,000/- रुपये.
 होला हुक्का शिशा तंबाखू प्लॅस्टीक पिशवी पॅकींग करण्याची लोखंडी मशीन, अंदाजे किंमत 65,000/- रुपये
 हिमालया बॅग क्लोजर प्लॅस्टीक चंुगळी शिलाई मशीन, अंदाजे किंमत – 50,000/- रुपये
 इलेक्ट्रीक वजन काटा - अंदाजे किंमत 15,000/- रुपये
 होला हुक्का शिशा तंबाखू पॅकींग करण्यासाठी वापरलेली फिलीप्स कंपनीची हेअरस्ट्रेटनर 02 नग, प्रत्येकी किंमत 2000 रु. प्रमाणे एकूण 4,000/- रुपये
 इतर – रिकामे टिनाचे डब्बे, टिनाच्या डब्याला सिल करण्याकरीता वापरल्या जाणारा सिल, टिनाचे गोल झाकण, प्लास्टीक टेप (चिकटपट्टी), पांढ­या रंगाची नायलॉनच्या पट्टया, कागदी खरड¬ाचे बॉक्स, प्लॅस्टीक, हिरव्या रंगाची प्लॅस्टीक पिशवी, प्लॅस्टीक पाऊच, स्टिकर्स इ. साहित्य - अंदाजे किंमत – 12,200/- रुपये
असा एकूण रु. 3,31,000/- रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखूचा साठा आणि एकूण रु. 4,53,200 रुपयाचा सुगंधीत तंबाखू तयार करण्याकरीता लागणारे मशीन व इतर साहित्य मिळून एकूण 7,84,200/- रुपये किंमतीचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.
याबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांनी पोलीस स्टेशन आरमोरी येथे आरोपीतांविरुद्ध अपराध क्रमांक 0348/2025 कलम – 59 (i), 26(2) (i), 26(2) (iv), 27(3) (e), 3(1)(zz) (iv) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-2006 सहकलम 3(5), 275, 274, 223, 123 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपी नामे ओमप्रकाश शंकर गेडाम याला पोलीसांनी अटक केली आहे. तसेच इतर चार आरोपी फरार असून त्यांचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. संतोष कडाळे, पोस्टे आरमोरी हे करीत आहेत. 
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांचे मार्गदर्शनात स्थागुशाचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. समाधान दौड, पोहवा/प्रेमानंद नंदेश्वर, पोअं/राजकुमार खोब्राागडे, रोहित गोंगले, चापोअं/गणेश पवार यांनी पार पाडली

Post a Comment

0 Comments