एमआयडीसी मैदानावर लॉयड मेटल्स (जीडीपीएल) क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी

एमआयडीसी मैदानावर लॉयड मेटल्स (जीडीपीएल) क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी





गडचिरोली, ता. ३ : लॉयड्स मेटल्स अॅंड एनर्जीच्या वतीने बुधवार (ता. ५)पासून स्थानिक  एमआयडीसी मैदानावर 'लॉयड्स मेटल्स गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग' (जीडीपीएल)क्रिकेट (लेदर बॉल) स्पर्धा प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या या भव्य ऐतिहासिक स्पर्धेसाठी एमआयडीसीचे मैदान सज्ज होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रसिद्ध क्रिकेटपटू तथा भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते  होणार आहे. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांची विशेष उपस्थिती राहिल.
या भव्य स्पर्धेसाठी एमआयडीसीच्या मैदानावर विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांना बसण्यासाठी चहुबाजुंनी प्रेक्षक गॅलरी आहे. रात्री सामने होणार असल्याने हाय व्होल्टेज फ्लड लाईट्स उभारण्यात आले आहेत. तज्ज्ञ क्युरेटर्सद्वारे तीन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. विशेष निमंत्रितांसाठी वेगळी आसन व्यवस्था, हिंदी, मराठीतील नामवंत समालोचकांसाठी विशेष आसन व्यवस्था,  खेळाडूंचे  पव्हेलियन व इतर सर्व व्यवस्था उच्च दर्जाच्या आहेत. याशिवाय गरजू व्यावसायिकांसाठी स्टाॅल्सही निर्माण करण्यात येत आहेत. या मैदानावर गेल्यावर एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर असल्याचा भास होतो. हे मैदान सुसज्ज करण्यासाठी शेकडो कामगार रात्रंदिवस राबत आहेत. हे मैदान सर्व सुविधायुक्त असावे यासाठी सर्वतोपरी लक्ष देण्यात येत आहे. मैदानातील सुविधा तसेच स्पर्धेच्या आयोजनासाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक एस. एस. खंडवावाला , निवासी संचालक सेवानिवृत्त कर्नल विक्रम मेहता, बलराम (भोलू) सोमनानी, रोहित तोंबर्लावार आदींसह सर्व आयोजक परीश्रम घेत आहेत.  या स्पर्धेचे प्रथम बक्षीस ११ लाख ११ हजार १११ रुपये राहणार आहे, द्वितीय बक्षीस ७ लाख, तृतीय बक्षीस ५ लाख व चौथे पारितोषिक २ लाख रुपये आहे. लीग मॅचमधील सामन्यात मॅन ऑफ द मॅच २५ हजार रुपये, क्वार्टर फायनल सामन्यात ५० हजार रुपये, सेमी फायनल सामन्यात ७५ हजार रुपये व फायनल सामन्याततील सामनावीराला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. प्रीमियर लीगमधील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यांना लाखो रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. प्रीमियर लीगमधील दहा ते १२ उत्कृष्ट खेळाडूंना राजस्थान रॉयल्स अकादमीत प्रशिक्षणाकरिता कंपनीतर्फे पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा गडचिरोली जिल्ह्यातील गुणवंत व होतकरू क्रिकेट खेळाडूंकरिता सोनेरी भविष्याची संधी ठरणार आहे. एकूणच या ऐतिहासिक स्पर्धेसाठी तशाच उच्च दर्जाचे उत्तम मैदान उभारण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments