एटापल्ली पोलिसाना मोठे यश -
धड़क कारवाही ,8,60,000 अवैध्य दारू साठा व वाहन मुद्देमाल सह १ आरोप अटक
शशांक नामेवार तालुका प्रतिनिधि एटापल्ली,
एटापल्ली,
गेल्या आठ ते दहा दिवसापासून गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळत होते की चंदन वेली येथील एक दारू तस्कर गेदा जंगल परिसरात दारू आणून इतर लोकांना वितरित करतो. यापूर्वी त्यावर दोन तीन वेळा छापा मारण्याचा प्रयत्न केला असता तो हातातून निसटला होता. परंतु रात्री मुसळधार पावसाचा फायदा घेऊन सदर आरोपीस वाटले की एवढ्या धो धो पावसात आता कोणीही पोलीस एवढ्या सखोल जंगलात येणार नाही या संधीचा फायदा घेऊन ते दारू वितरित करणार आहे अशी बातमी पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल चंदू शिकृतीवार यांना मिळाली त्यांनी सदरची बातमी पोलीस निरीक्षक नागरगोजे साहेब व एस डी पी ओ कदम साहेब यांना कळविली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस स्टेशनचे एपीआय मडावी साहेब, पीएसआय गिरवलकर, PSI वनवे, पोलीस हवा. कालेश पुपरेडीवार, पोलीस कॉन्स्टेबल चंदू शिकृतीवार, रोशन पुराण व रमेश वेलदा यांनी रात्रीच्या सुमारास जंगल परिसरात सापळा लावून सदर आरोपीस ट्रॅक्टर व मुद्देमानासह रंगे हात पकडून त्याच्याकडील मुद्देमाल
28 पेट्या रॉकेट संत्रा देशी दारू (90 ml) व एक पेटी रॉयल ग्रीन (180ml) दारू मिळून आली. किंमत 2,60000 व 600000रु किमतीचा ट्रॅक्टर असा 8,60,000 रु.मुद्देमाल आरोपी नामे अजित केशव कुळयेटी वय 32 वर्षे, राहणार चंदन वेली याच्याकडून जप्त केला व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.
त्यांच्याकडे सदर दारू बाबत व ट्रॅक्टर बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरची दारू मी स्वतः चंद्रपूर येथून आणली असून ट्रॅक्टर माझ्या मामाचा आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय मोतीराम मडावी साहेब करीत आहेत.
0 Comments