मेळाव्याच्या निमित्याने महिलांनी एकत्रित येऊन होनाऱ्या अन्याय व अत्याचारला लढा दिला पाहिजेत.... योगिता पिपरे
गडचिरोली,
श्री. संताजी बहुउदेशीय सेवा मंडळ आरमोरी जिल्हा गडचिरोली द्वारा आयोजित श्री. संत संताजी जगानडे महाराज पुण्यतिथी व तेली समाज मेळावा वधू-वर परिचय मेळावा तसेच ज्येष्ठाचा सेवानिवृत्त व प्रविण्य प्राप्त विद्याथ्यांचा गुण गौरव व सत्कार सोहळा दि. 5.1.2025.रोज रविवारला संताजी ग्राउंड, कोसा विकास जवळ वडसा रोड आरमोरी येथे पार पडला.
*!!सौ. योगिताताई पिपरे उपाध्यक्ष विदर्भ महिला आघाडी महा.प्रां. तेली महासभा तथा माजी. नगराध्यक्ष न. प. गडचिरोली !! यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि.
आपल्या समाजातील महिलांनी होण्याऱ्या अन्याय व अत्याचार विरोधात एक होऊन लढा देण्याकरिता स्वतः मध्ये ताकत निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
तसेच महिलांनी शासनाच्या मोफत योजनाचा फायदा उदा. मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना, सुकन्या योजना,मोफत राशन, महिलांना बस ची अर्धी तिकीट,बेटी बचाव बेटी पडाव, उज्वला गॅस, मातृत्व वंदन योजना, वयोश्री योजना, धार्मिक स्थळांना भेटी देणे योजना, इत्यादी योजनाचा फायदा घ्यावा व संताजी आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून व बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी फायदा घेऊन आपली आर्थिक उन्नती करावी असे आव्हाहन योगिताताई पिपरे यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री.भाग्यवानजी खोब्रागडे साहेब, अध्यक्ष, श्री. किसनराव खोब्रागडे एज्यूकेशन सोसायटी, आरमोरी.
मुख्य मार्गदर्शक, मा. श्री. बबनरावजी फंड साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा.
प्रमुख अतिथी, श्री. प्रमोदजी पिपरे,अध्यक्ष महाराष्ट्र प्रा. ते. महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली,श्री. प्रभाकरजी वासेकर अध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली,श्री. संजयजी येरणे सामाजिक वक्ते नागभीड, श्री. परसरामजी टिकले माजी. सभापती प. सं. वडसा, प्रा. पुंडलिकजी जुवारे,श्री. भाष्करराव बोडणे उपसरपंच ग्रामपंचायत, वैरागडे, श्री. पुंडलिकराव जुवारे ठानेगाव, श्री. मुखरुजी खोब्रागडे माजी. अध्यक्ष, तेली समाज वैरागड, श्री. डॉ.प्रदीपजी चापले प्रा. वनश्री महाविद्यालय, कोरची.
या वेळी आयोजक श्री. बुधाजी किरमे अध्यक्ष, श्री. रामभाऊ कुरझेकर उपाध्यक्ष, श्री. देविदास नैताम सचिव, श्री. तुळशीरामजी चिलबुले सहसचिव (से. नी तहसीलदार )श्री. विवेक घाटूरकर कोषाध्यक्ष, श्री.शंकरराव बावणकर, श्री. गंगाधरजी जुवारे, श्री.मिलिंदजी खोब्रागडे, श्री. द्वारकाप्रसाद सातपुते, श्री.विलास सातपुते व सर्व तेली समाज युवक युवती बहुसंख्येने उपस्थित होते.
0 Comments