समाजहित जोपासणारा कट्टर शिवसैनिक अरविंदभाऊ कात्रटवार

समाजहित जोपासणारा कट्टर शिवसैनिक अरविंदभाऊ कात्रटवार.


गडचिरोली,
गडचिरोली जिह्यातील राजकारणात राजकारणासोबतच समाजसेवेचे व्रत जोपासणारा नेता म्हणून ज्या मोजक्या नेत्यांचे नाव घेतल्या जाते. त्यात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांचे नाव अग्रक्रमाने लागतो. 80 टक्के समाजकारण व केवळ निवडणुकीपुरते 20 टक्के राजकारण करण्याचा भाऊंचा स्वभाव असल्याने ज्यांचे सर्वच राजकीय पक्षात जिवाभावाचे मित्र आहेत. सच्चा मित्र अशी वर्तणूक तसेच सर्वांसाठी धावून जाणारे असल्याने त्यांचा सर्वच क्षेत्रात मित्रमंडळींचा मोठा गोतावळा आहे. समाजकार्याला प्राधान्य देणारा बाळासाहेबांचा एकनिष्ठ, कट्टर शिवसैनिक म्हणून अरविंद कात्रटवार यांची ओळख आहे.

1992 मध्ये विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख म्हणून नेमणूक झाली होती. शिवसेनेत सामाजिक कार्य करीत असताना लढाऊ वाण्याच्या नेत्यावर मोर्चा, चक्काजाम

आंदोलन उपोषण आदी 11 गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, भाऊंनी न डगमगता आपल्या समाजसेवेच्या कार्यात कधीच खंड पडू दिला नाही. त्यांच्या कार्यकर्तुत्वामुळे मागील 21 वर्षे त्यांनी उपजिल्हाप्रमुख पद सांभाळली. त्यांनी विविध उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना जीवनावश्यक साहित्य, रक्तदान शिबिर, आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत, बी-बियाणे, खते वाटप आदींच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. कोरोना संकटकाळात स्थलांतरित कामगार व गरजू व्यक्तींना मदत करीत जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना हातभार लावून सढळ हाताने सहकार्य केले. ते निःस्वार्थ समाजसेवेचा परिचय असल्याचे गौरवोद्वार शिवसेना (उबाठा) उपतालुका प्रमुख यादव लाहंबरे यांनी काढले.

Post a Comment

0 Comments