गडचिरोली-चिमूर लोकसभेची जागा मित्रपक्षाला नको; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा


गडचिरोली-चिमूर लोकसभेची जागा मित्रपक्षाला नको; भाजप कार्यकर्त्यांचा इशारा


गडचिरोली,
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र भाजपचा बालेकिल्ला असून, या क्षेत्राची जागा कुठल्याही परिस्थितीत महायुतीच्या मित्रपक्षांना न देता ती भाजपला द्यावी, अशी मागणी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली. यामुळे महायुतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

२००९ मध्ये तत्कालिन चंद्रपूर आणि चिमूर या दोन लोकसभा क्षेत्रांचे विभाजन करुन गडचिरोली-चिमूर हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. चंद्रपूरमधून हंसराज अहीर, तर चिमूरमधून महादेवराव शिवणकर आणि नामदेवराव दिवटे अनेकदा भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. गडचिरोली- या नव्या मतदारसंघातून अशोक नेते दोन वेळा निवडून आले. एकूणच हा मतदारसंघ मागील ३० वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. जिल्हा परिषद आणि नगर परिषदां भाजपने सत्ता प्रस्थापित केली आहे. अशा परिस्थितीत ही जागा 
महायुतीच्या मित्रपक्षाला देणे योग्य नाही. भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला तिकिट द्या, पण मित्रपक्षाला नको, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली. विशेष म्हणजे, विद्यमान खासदार अशोक नेते हे सक्षम उमेदवार असल्याचेही काही भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आजची पत्रकार परिषद खासदार अशोक नेते यांच्या निवासस्थानी झाली. या पत्रकार परिषदेकडे भाजपच्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. एकीकडे कार्यकर्त्यांनी मित्रपक्षाला तिकिट नको असे सांगितले असले, तरी भाजपकडून नवख्या उमेदवाराच्या नावाचीही चर सुरु आहे. अशा स्थितीत भाजपमधील अंतर्गत मतभेद आणि मित्रपक्षांशी असलेला संघर्ष उघड झाल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments