महाशिवरात्रीनिमित्त वैरागड येथे महाअभिषेक व भजन स्पर्धा - सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती

महाशिवरात्रीनिमित्त वैरागड येथे महाअभिषेक व भजन स्पर्धा - सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती
गडचिरोली ८ व ९ मार्च रोजी सायंकाळी भोलुमाऊ सोमनानी मित्र परिवार वैरागडच्या वतीने महाअभिषेक व भजन स्पर्धा वैरागड येथे भोलू सोमनानी यांच्या घरासमोरील आवारात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भजन स्पर्धेचे उद्घाटन होणार असून स्पर्धेला सायंकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. यावेळी ना. धर्मरावबाबा आत्राम, सहकार महर्षी अरविंद सा.
पोरेड्डीवार, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त डॉ. चरणजितसिंग सलुजा उपस्थित राहणार आहेत. उ‌द्घाटन वैरागडच्या सरपंचा संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे यांच्या हस्ते होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा. पं. सदस्या संगीता मेश्राम, आदेश आकरे, सत्यदास आत्राम, चंद्रविलास तागडे, प्रतिभा बनकर, छानू मानकर, रेखा भैसारे, मनिषा खरवडे, गौरी सोमनानी, शितल

सोमनानी, दिपाली ढंगरे आदी उपस्थित राहणार आहेत.

९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता महाहवनाला सुरुवात होणार आहे. दुपारी ४ वाजता सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता गोपालकाला व सायंकाळी ६ वाजतापासून महामोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेत १० हजार १ रुपये प्रथम, ८ हजार १ द्वितीय, ६ हजार १ तृतीय, ४ हजार १ चतुर्थ व पाचवे २ हजार

१ रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. भजन मंडळाला कमीत कमी एक भजन महादेवाचे म्हणणे अनिवार्य आहे. तसेच ग्रामपंचायत वैरागड, मोहझरी, सुकाळा, कुरुंडी माल, देलनवाडी, मानापूर, कुलकुली, माकरोंडी येथील सदस्य तसेच सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक व नाट्य कलावंतांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन भोलूभाऊ सोमनानी व मित्र परिवार वैरागड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments