इंजि.प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते लांजेडा/इंदिरनगर येथिल बैलांचा जंगी शंकरपटाचे समारोप.

इंजि.प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते लांजेडा/इंदिरनगर येथिल बैलांचा जंगी शंकरपटाचे समारोप.

श्री संताजी जगनाडे महाराज सेवा समिती च्या वतीने बैलांचा कृषी मेळावा व शंकरपट महोत्सव संपन्न


गडचिरोली

     श्री संत संताजी जगनाडे महाराज सेवा समिती, लांजेडा/इंदिरा नगरच्या वतीने बैलांचा कृषी मेळावा व बैलांचा जंगी शंकरपटाचे इंदिरा नगर/लांजेडा येथील नवीन तलावाच्या बाजूला दि.५ मार्च ते १५ मार्च २०२४ पर्यंत आयोजित केलेले होते.
 आज बैलांच्या जंगी शंकरपटाचे समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.शंकरपटामध्ये समारोपिय कार्यक्रमाच्या वेळी महादेव मनोहर टिकले मु.चकघमोटी,विहिरगाव विरुद्ध एस.के,इंदिरानगर  गडचिरोली यांच्या बैल जोड्यांची शर्यत झाली.यामध्ये महादेव मनोहर टिकले यांच्या बैल जोडीने विजय प्राप्त केले.
    लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते विजेत्या बैलजोडी मालकाला बक्षीस वितरण करीत श्री.संताजी जगनाडे महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित बैलांचा कृषी मेळावा व शंकरपट महोत्सवाचे समारोप करण्यात आले
        याप्रसंगी बाळुजी भांडेकर,नरेंद्रजी भांडेकर,श्री  संत संताजी जगनाडे महाराज सेवा समिती चे अध्यक्ष जयदेव नैताम, रोशन भांडेकर,उपाध्यक्ष आनंदराव भांडेकर,किरण नैताम, सचिव राकेश नैताम, अंकलेश बोबाटे,सहसचिव उद्धव नैताम, जितु बडोले, कैलास भांडेकर व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments