कोरची-
तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथील बहुउद्देशीय सभागृहात सर्च आणि मुकुल माधव फांऊडेशन यांच्या सयुक्तिक विद्यमाने दोन दिवशीय तारुण्यभान- जीवन शिक्षण कार्यक्रमाची कार्यशाळा दिनांक १८ व १९ आगस्ट२०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेला आश्रम शाळेतील इयत्ता ८वी ते १२ वी पर्यंतच्या ३०० विद्यार्थ्यी सहभागी होऊन लाभ घेतला.
सदर कार्यशाळेत वयात येताना शारीरिक व मानसिक बदल,प्रेम,आकर्षण,व मैत्री यातील फरक, प्रजनन इंद्रिये रचना व कार्य, मासिक पाळी काळजी व स्वच्छता, स्वप्नदोष समज गैरसमज, बेजबाबदार लैंगिक वर्तनातून निर्माण होणाऱ्या समस्या, मुलगा-मुलगी कशी ठरते, जुळी मुले कशी होतात याची कारणे, गुप्तरोग व एड्स तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यामध्ये तंबाखू, गुटखा, दारु व्यसन विरोधी जागृती घडवून आणणे आदी विषयावर व्हिडीओ च्या माध्यमातून सविस्तर माहिती व चर्चा करण्यात आली. तसेच खेळाच्या माध्यमातून नातेसंबंध, आत्मविश्वास वाढविणे, संवाद कौशल्य, संघटन कौशल्य, संगत या विषयावर माहिती देण्यात आली
कार्यशाळेचे उदघाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक सर होते,प्रमुख अतिथी सर्च येथील तारुण्यभान- जीवन शिक्षण कार्यशाळेचे प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, समन्वयक राजेंद्र इसासरे,समन्वयक सौ.सुनंदा खोरगडे शाळेतील हरेश कामडी, अरुण कायंदे, प्रमोद शंभरकर, मनोज गजभिये, अभिमन्यु वाटगुरे, राहुल अंधारे, भैयालाल कुरसंगे, गुरुराज मेंढे,अधिक्षक नितीन दुधे, संतोष सहारे,अमित मेश्राम, दिक्षा कोवे आरोग्य सेविका, नैना यंगलवार आदी कार्यशाळेला उपयोग होते. कार्यशाळेचे संचालन संतोष सहारे यांनी केले तर आभार अमित मेश्राम यांनी मानले.
0 Comments