भाजपा निवडणूक कार्यालयाचे थाटात उद्घाटन.
इंदिरानगर बसवण्यात भाजपाचेच योगदान. - प्रमोद पिपरे
आज दि.26 नोव्हेंबर 2025 रोजी बुधवार ला इंदिरानगर प्रभाग 3 भाजपाचे नगराध्यक्षचे अधिकृत उमेदवार सौ. प्रानोती सागर निंबाळकर व नगरसेवकाचे अधिकृत उमेदवार श्री.अनिल पांडुरंग कुंनघाडकर (अ) , सौ. योगिता प्रमोद पिपरे (ब) यांच्या
इंदिरानगर, स्नेहनगर प्रभाग क्र. ०३ निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन, मा. खासदार डॉ. अशोक नेते राष्ट्रीय महामंत्री आदिवासी मोर्चा ,भाजपाचे जिल्हा अध्यक्ष मा. श्री. रमेश बरसगडे यांच्या अध्यक्ष खाली झाले, प्रमुख उपस्थिति म्हणून जिल्हानिवडणूक प्रमुख प्रशांत वाघरे,माझी आमदार डॉ. नामदेव उसेंडी भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे ,रमेश भुरसे, विलास पाटील भांडेकर,नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ प्रनोती निंबोरकर , नगरसेवकचे उमेदवार जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला आघाडी गडचिरोली सौ.योगिता प्रमोद पिपरे (माजी नगराध्यक्ष) श्री.अनिल कुंनघाडकर माजी उपाध्यक्ष व भाजपा शहर अध्यक्ष गडचिरोली या वेळी मार्गदर्शन केले.
प्रमोद पिपरे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, इंदिरानगर बसविण्यात भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार अशोकजी नेते, बाबुरावजी कोहळे रमेशजी भुरसे व मी स्वथा झटलेले असून,इंदिरानगर च्या वस्तीला हटविण्यासाठी वनविभाग कडून वारंवार प्रयत्न झाले परंतु आम्ही इंदिरानगरातील वस्तीला हात लावू दिले नाही, ही वस्ती वाचविण्यासाठी आम्ही पर्यन्त केले, इंदिरानगर हा वनविभागाच्या जागेवर बसलेला आहे, त्यामुळे अतिक्रमण धारकास घराचे पट्टे मिळन्यास विलंभ होत आहे, नगर परिषदेवर भाजपाची एक हाती सत्ता दिल्यास,आपल्याला वचन देतो की प्रत्येक घराचे गावठाण सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम करणार असून,सर्वांना घरकुल देण्यात येईल,सर्वांना भरपूर दोन वेळा नळाचे पिण्याचे पाणी मिळणार,नवीन सिमेंट काँक्रिट रस्ते, बंदिस्त सिमेंट काँक्रिट नालीचे बांधकाम, व अशा अनेक सुख सुविधा करण्याचा मानस आमचा राहणार आहे,असे आपल्या भाषणात प्रमोदजी पिपरे बोलत होते.
यावेळी बंडुजीझाडे , नरेश हजारे, सागर निंबोरकर, चंदाताई बुरांडे , नरेंद्र भांडेकर , नानाजी सुरपाम , रत्नमाला शेटे, वनिता सुरपाम ,यशवंत झरकर प्रभागातील भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख ,पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

0 Comments