प्रभाग क्रमांक 7 आशीर्वाद नगरात सौ. खुशबू रणदिवे यांच्या नावावर जनतेचा विश्वास – कार्यकर्तेत झपाट्याने वाढ
गडचिरोली :
गडचिरोली नगरपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच प्रभाग क्रमांक 7 आशीर्वाद नगर येथे सौ. खुशबू मंगेश रणदिवे यांच्या नावाभोवती जोरदार चर्चा रंगू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात घराघरात, चौका,चौकात खुशबू रणदिवे यांच्या कार्याचा आणि त्यांच्या संभाव्य उमेदवारीचा विषय चर्चेचा ठरला आहे.
कॅम्प एरिया, गोकुळनगर आणि आशीर्वाद नगर परिसरात नुकत्याच झालेल्या जनसंपर्क करून नागरिकांकडून त्यांना प्रेमाचा वर्षाव केला आणि लोकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केले, आणी सामाजिक जनतेच्या प्रश्न विचारले, लोकाचा भेटी दरम्यान चागला प्रतिसाद मिळाला. उच्च शिक्षण घेतलेली, नम्र स्वभावाची आणि सामाजिक कार्यात सातत्याने पुढाकार घेणारी अशी खुशबू मंगेश रणदिवे यांची ओळख निर्माण झाली आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांनी स्थानिक जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
स्थानिक नागरिकांनी बोलताना सांगितले की "खुशबू रणदिवे आमच्या भागात नेहमी उपलब्ध असतात. कोणतीही अडचण आली की त्या तत्काळ मदतीस धाव घेतात. त्यांच्या रुपाने आमच्याकडे एक सक्षम महिला नेतृत्व तयार होत आहे."
या जनतेच्या सकारात्मक प्रतिसादामुळे खुशबू रणदिवे यांच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली असून, भाजपकडून प्रभाग क्रमांक 7 मध्ये त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.
भाजपमधील अनेक कार्यकर्ते, महिला आणि युवक-युवती वर्गाने खुशबू रणदिवे यांना सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे. शेकडो कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात स्वयंस्फूर्तीने उतरले असून, आशीर्वाद नगरात भाजपचा झेंडा खुशबू रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली फडकवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

0 Comments