आरमोरी नगरपालिका निवडणूक शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढणार – जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर

आरमोरी नगरपालिका निवडणूक शिवसेना (शिंदे गट) स्वबळावर लढणार – जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर
आरमोरी,
गडचिरोली जिल्ह्यातील येथील शिवसेना (शिंदे गट) ची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ. गोंदोळे, तालुका प्रमुख कमलाकर चाटारे, तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत आरमोरी नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. सर्व प्रभागात उमेदवारांची चाचपणी पूर्ण झाल्याने आगामी नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "प्रत्येक प्रभागात भेटीगाठी वाढवा, नागरिकांशी संवाद साधा आणि पक्षाच्या उमेदवारांच्या विजयानासाठी झटून प्रयत्न करा." त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "शिवसेना (शिंदे गट) जनतेच्या विश्वासावर स्वबळावर निवडणूक लढवेल आणि बहुमताने सत्ता स्थापनेचा निर्धार केला आहे." या बैठकीत शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या स्वबळावरील निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले.

Post a Comment

0 Comments