गडचिरोली नगरपालिका शहरातील नव्या विचारांचा नवा प्रवास…ताई आपली हक्काची!
सौ. ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांचा प्रभाग २ मधील घरोघरी दौरा
गडचिरोली ,
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. २ मध्ये सौ. ॲड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्या घरोघरी भेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे
नव्या विचारांचा नवा प्रवास, ताई आपली हक्काची” या घोषणेने प्रेरित होऊन सौ. निंबोरकर यांनी आज संपूर्ण प्रभागातील घराघरात पोचत नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांच्या दैनंदिन स्थानिक समस्या, विकासाच्या अपेक्षा, मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणी यांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली.
प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सुरक्षितता या महत्त्वाच्या विषयांवर नागरिकांनी मते व्यक्त केली. यावेळी सौ. निंबोरकर यांनी नागरिकांना खात्री दिली की
शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर राहीन. प्रभागाचा दर्जा उंचावणे आणि शहराला आधुनिक स्वरूप देणे हेच माझे ध्येय आहे.
त्यांच्या या संवाद उपक्रमाला प्रभागातील नागरिकांनी सकारात्मक व उबदार प्रतिसाद दिला. अनेकांनी त्यांच्यावर विश्वास दर्शवत विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मागण्या मांडल्या.
दौऱ्यादरम्यान सौ. ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांनी लोकांमध्ये आत्मियता निर्माण करत प्रभाग विकासासाठी ठाम संकल्प व्यक्त केला.

0 Comments