पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर माजी आमदार कृष्णा गजबेतलाठी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थितीत पाहणी

पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर माजी आमदार कृष्णा गजबे

तलाठी व प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थितीत पाहणी
देसाईगंज:--- गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे कापणी तयार झालेल्या धानपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी मेहनतीने वाढवलेली पिके शिल्लक राहिली नाहीत, तोंडाशी आलेला घास अक्षरशः निसटल्यासारखे झाले आहे. अवकाळी पावसाने फक्त धानच नव्हे तर सर्व शेतपिकांना आता फटका बसला आहे, मात्र जिल्ह्यातील मुख्य पीक धान असल्यामुळे त्याचे नुकसान सर्वाधिक झाल्याचे दिसून येत आहे.

देसाईगंज तालुक्यातील मौजा कोंढाळा परिसरातील भास्कर पत्रे, आनंदराव बेद्रे, दादाजी मेश्राम, भगवान मेश्राम यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली.  यांचेसह परिसरातील कित्येक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. सद्य परिस्थितीत शेतकरी हताश आहेत. अशाच वेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी आज दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२५ रोजी  तलाठी व स्थानिक शेतकऱ्यांसह प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेत तातडीने पंचनामे करण्याच्या आणि नुकसानभरपाई निश्चित करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

माजी आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंजसह आरमोरी, कुरखेडा व कोरची या चारही तालुक्यांतील तहसीलदार व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून, पुढील २४ तासात बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करावेत, असा स्पष्ट आदेश दिला. पावसामुळे झालेल्या नुकसानीची शासन स्तरावर तातडीने भरपाई मिळावी यासाठी सरकार मोहिमेद्वारे करू शकते, असा विश्वासही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

या पाहणी दौऱ्यात माजी आमदार गजबेंसोबत तालुका अध्यक्ष सुनील पारधी, तलाठी ठाकरेजी, ज्ञानेश्वरजी चौधरी, शेषरावजी नागमोती, भास्कर पत्रे, आनंदराव बेद्रे, सुरेश झिलपे, विनायक पारधी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे, भास्कर पत्रे, आनंदराव बेद्रे, दादाजी मेश्राम, भगवान मेश्राम ह्या बाधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतात झालेल्या नुकसानीची माहिती उपस्थितांना दिली.

 *शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी* 

शासन आपलेच असल्याने बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही माजी आमदार गजबे यांनी दिली. केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीला भरपाईसाठी निधी तात्काळ मंजूर करावा, अशीही मागणी त्यांनी केली. स्थानिक प्रशासनही शेतकऱ्यांच्या हितासाठी तात्काळ कार्यवाहीस सज्ज असल्याचे आढळले.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि आश्वासक वातावरण दिसून आले. प्रशासन व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे त्यांच्या पाठीशी असल्याचे जाणवले. सरकारच्या सकारात्मक निर्णयाने शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक दिलासा मिळेल, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments