हिरावलेल्या पानसे कुटुंबियांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिले जगण्याचे बळ



जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केली कुटुंबियाला आर्थिक मदत..!


गडचिरोली,

गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रानखेडा येथील सक्रीय शिवसैनिक गोपाल पानसे याचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. कुटुंबातील आधार हिरावल्या गेल्याने पानसे कुटुंबियावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या दु:खद निधनाबाबत शोक व्यक्त करीत कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबियाला आर्थिक मदत देऊन मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही देत कुटुंबियाला दु:खातून सावरण्याचे बळ दिले.
उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात आपल्या शिवसैनिकांची मोठी फळी निर्माण झाली. कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे या भागात उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद वाढली आहे. कार्यकर्ते हे पक्षाची ताकद असतात, त्यांच्यामुळेच ग्रामीण भागात काम करण्यास बळ मिळते. गोपाल पानसे हे सक्रीय शिवसैनिक होते. मौशिखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात शिवसेना उबाठा पक्षाची ताकद उभी करण्यात गोपाल पानसे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. एक सच्चा कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड निघून जाणे दुखदायक आहे. परमेश्वर पानसे कुटुंबियांना दुखातून सावरण्याचे बळ देवो, अशी शोक संवेदना अरविंदभाऊ कात्रटवार यांनी व्यक्त केली. आपल्याला भविष्यात कोणतीही अडचण अथवा मदत भासल्यास हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक म्हणून सदैव तत्पर आहे. अशी ग्वाही दिली. अरविंदभाऊ कात्रटवार यांनी घरी येऊन कुटुंबियाची आस्थेने विचारपूस करून धीर दिल्याने पानसे कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, नवनाथ उके, प्रशांत ठाकुर, संदिप आलबनकर, सुरज उईके, दिपक लाडे, अमित बानबले, संदिप भुरसे, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, दिलीप चनेकार, अंबादास मुनघाटे, दिलीप वलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम यासह असंख्य शिवसैनिक व रानखेडा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments