स्व. आर आर पाटील (आबा) यांना जयंती निमित्त गडचिरोलीत अभिवादन

स्व. आर आर पाटील (आबा) यांना जयंती निमित्त गडचिरोलीत अभिवादन



गडचिरोली, 
१६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांना जयंती निमित्त गडचिरोली शहरातील प्रमुख असलेल्या इंदिरा गांधी चौकात स्व. आर आर पाटील पाटील यांच्या प्रतिमेला माल्यारपण व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  आबांनी या जिल्ह्याच्या विकासात दिलेले योगदान मोठे असल्याचे सांगत  माजी नगरसेविका मिनल चिमुरकर, ज्येष्ठ नेते नईम शेख, अमर खंडारे रा कॉ पा सेवादल जिल्हाध्यक्ष, जिल्हा महिला सरचिटणीस सुषमा येवले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडचिरोली शहरअध्यक्ष अमोल कुळमेथे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सेवादल अध्यक्ष सुनिल कत्रोजवार, आरती कोल्हे राकॉ महिला निरीक्षक, सुनिल चिमूरकर, सुरेश जोंधळे, शाहरुख पठाण, रमेश बनसोड, हरीश कुमरे, यांचे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments