हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम यशस्वी करा - डॉ. देवराव होळी

हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम यशस्वी करा - डॉ. देवराव होळी
    
 गडचिरोली,
   हत्तीरोग हा घातक असा रोग असून यात शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होतात. यावर उपचार केले नाही तर संबंधित व्यक्तीचे आयुष्य निरर्थक बनते यासाठी हतीरोगाचे उच्चाटन करण्यासाठी अत्यंत परिणामकारक औषधांचा वापर होणार आहे. समाजातील कोणतीही व्यक्ती या रोगाच्या उपाययोजना पासून वंचित राहू नये म्हणून हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीमेत सहभागी होऊन औषधांचे सेवन आरोग्य कर्मचार्यांचे समक्ष करून हि मोहीम यशस्वी करावी असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. 
       राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत हत्तीरोग दूरीकरण औषधोपचार मोहीम चामोर्शी व आरमोरी तालुक्यात दिनांक १० ते २० फेबुवारी २०२३ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चामोर्शी येथे दिनांक १० फेबुवारीला आयोजित करण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.कुणाल मोडक, हत्तीरोग अधिकारी डॉ. महेंद्र देवळीकर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल हुलके उपस्थित होते. चामोर्शी तालुक्यात एकून १९९ गावे असून घोट, रेगडी, आमगाव महाल,भेंडाला, कोनसरी, मार्कंडा कंसोबा या साथ प्राथमिक आरोग्य केंद्रातील ५३ उपकेंद्र मधील पात्र असलेल्या एक लाख ६२ हजार १२२ लाभार्थ्यांना आरोग्य कर्मचारी यांचे समक्ष गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. दोन वर्षाआतील बालके, गरोदर माता, दुर्धर आजारी असलेल्याना हत्तीरोग गोळ्याचे सेवन करता येणार नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रफुल हुलके यांनी मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी दिली.

Post a Comment

0 Comments