चामोर्शी तालुक्यातील सेवा सहकारी संस्था निवडणूक जाहीर.

चामोर्शी तालुक्यातील सेवा सहकारी संस्था निवडणूक जाहीर.
चामोर्शी तालुक्यातील सेवा सहकारी,खरेदी विक्री संघ व बाजार समिती संस्थेतील प्रस्थापित हुकूमशाही विरोधात एकजुटीने निवडणुक लढवीणार - आशीष पिपरे , नगरसेवक तथा जिल्हा महामंत्री ओबीसीआघाडी ,भाजपा


चामोर्शी,
चामोर्शी तालुक्यातील खरेदी विक्री ,सेवा सहकारी व बाजार समिती मधे प्रस्थापित हुकूमशाही एकाधिकार शाही व मनमानी कारभारामुळे येथील जनता त्रस्त असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे ,या संस्थेत अनेक शेकडो भागधारक सभासदाची नावे मतदार यादीतून नियम बहाय रीतीने वगळून निवडणूक अविरोध करुन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत आहेत व या विरोधात जनतेने अनेकवेळा मोर्चे ,उठाव व आंदोलन केले आहे परंतु काही प्रस्थापितांना सहकार क्षेत्रातील काही अधिकारी यांचा आशीर्वाद व सेवा मिळत  आहे त्यामुळे अभय मिळत असल्याने  व विविध चुकीच्या पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून नियमबाह्य कामे करून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत आहे व प्रामुख्याने सेवा सहकारी संस्थेत क्रियाशील व अक्रियाशील भागधारक मतदारांना मतदानाचा अधिकार असताना नियमबाहाय व हुकूमशाही पद्धतीने शेकडो भागधारक शेतकऱ्यांची नावे वगळून अन्याय करण्यात आला व आजपर्यंत न्याय मिळाला नाही,शेवटी मुंबई उच्च न्यायालयात खरेदी विक्री संघ अविरोध निवडणूक विरोधात  दाद मागितली व सदर निर्णय न्यायप्रविष्ठ आहे,या विषयावर आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे व आता या एकाधिकारशाही विरोधात वज्रमूठ बांधून तळागाळातील शेवटच्या भागधारक शेतकरी बांधवांना एकत्रित करून धनशक्ती विरोधात जनशक्ती पॅनल उभा करून एकजुटीने पुढील सर्व सहकार क्षेत्रातील निवडणुका लढवणार असे आवाहन नगरसेवक आशीष  पिपरे यांनी केले यावेळी प्रामुख्याने बाजार समिती माजी संचालक अशोक धोडरे ,माणिकराव तुरे अध्यक्ष महसूल व वनहक्क समिती जिल्हा गडचिरोली व सोशल मीडिया प्रमुख रमेश अधिकारी उपस्थित होत

Post a Comment

0 Comments