भाजप महिला आघाडीच्या वतीने सखी लोक संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक गीताताई गुडडी यांचा सत्कार

भाजप महिला आघाडीच्या वतीने सखी लोक संचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक गीताताई गुडडी यांचा सत्कार


गडचिरोली :- 
 
      देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान होऊन 9 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. या 9 वर्षात त्यांनी केलेले चांगले कार्य व विविध योजना या तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मोदी-9 महा जनसंपर्क अभियान 30 मे ते 30 जुन 2023 पर्यन्त राबविण्यात येत आहे. या महा जनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकारी व विविध संस्थांमधील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या पदाधिकारी महिलांचा सत्कार कार्यक्रम सुरू आहे.
      या कार्यक्रमा अंतर्गत गडचिरोली येथील महिला आर्थिक विकास महामंडळ मधील सखी लोकसंचालित साधन केंद्राच्या व्यवस्थापक गीताताई गुड्डी यांनी महिलांना व युवतींना विविध प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांच्या या अथक परिश्रमामुळे अनेक महिला व युवतींना रोजगार उपलब्ध झालेला आहे. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी त्या निरंतर परिश्रम घेत आहेत, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने जिल्हा प्रभारी तथा माजी  नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते व्यवस्थापक गीताताई गुड्डी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी डॉक्टर सचिन देवतळे भाजपच्या जिल्हा सचिव प्रतिभाताई चौधरी, महिला ओबीसी मोर्चाच्या शहराध्यक्ष अर्चना निंबोड, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, साधन केंद्राच्या उज्वला रायपुरे, बेबीताई सिडाम, आकाश गडपायले उपस्थित होते.
   यावेळी महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 9 वर्षात अनेक विकासात्मक कामे केली असून अनेक लोकाभिमुख योजना अंमलात आणल्या तसेच महिलांसाठी विविध योजना सुरू करून महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगून त्यांच्या 9 वर्षातील कार्याचा लेखा जोखा मांडला.
  यावेळी सखी लोक संचालित साधन केंद्रात शिवणक्लास, ब्यूटी पार्लर व अन्य विविध प्रशिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी रसिका मानकर, प्राजक्ता खोब्रागडे, श्रद्धा राऊत, अनामिका कलसार, नेहा देशमुख, सलोनी अलोने, मयुरी देशमुख, रुपाली लाकडे, अल्का नागोसे, ज्ञानेश्वरी मुळे, नूतन करकाडे इत्यादी महिला व युवती कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments