स्नेहसंमेलन म्हणजे चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ -
माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांचे प्रतिपादन
लांजेडा नगर परिषद शाळेत सांस्कृतिक व बाल क्रीडा स्नेह संमेलन
गडचिरोली :
विद्यार्थ्यांना दैनंदिन शाळेच्या व अभ्यासातून थोडी मोकळीक मिळावी व त्यांचे मनोरंजन व्हावे व त्यांच्यातील क्रीडा गुणांचा विकास व्हावा व त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना चालना मिळावी व विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी या उदात्त हेतूने या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे हि खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक व बाल क्रीडा संमेलनातून आपल्यातील कलागुण विकसित करून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा व आपणही कुण्यापेक्षा कमी नाही हे इतरांना दाखवून द्यावे. विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन अभ्यासातून थोडा वेळ काढून खेळाकडेही लक्ष द्यावे व आपल्या भावी जीवनात उत्तरोत्तर प्रगती करावी स्नेह संमेलन म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना देणारे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले. संत जगनाडे महाराज नगर परिषद प्राथमिक शाळा लांजेडा येथे आयोजित सांस्कृतिक व बाल क्रीडा संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
संत जगनाडे महाराज नगर परिषद प्राथमिक शाळा लांजेडा गडचिरोली च्या वतीने विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक व बाल क्रीडा स्नेह संमेलनाचे आयोजन काल दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभ पर्वावर लांजेडा येथील नगर परिषद प्राथमिक शाळेत करण्यात आले होते. या स्नेहसंमेलनाचे उदघाटन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, नगर परिषद शाळांचे केंद्रप्रमुख प्राचार्य सुधीर गोहणे, विस्तार अधिकारी गेडाम, शिक्षक पटले सर, संजय बोदलकर भास्कर कोठारे आबाजी चिचघरे, भांडेकर, सौ चिचघरे , नरेंद्र भांडेकर उपस्थित होते.
या स्नेह संमेलनात 1 ते 4 च्या विद्यार्थ्यांसाठी कब्बडी , खो-खो इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्नेह संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
0 Comments