टिफिन बैठकीत जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी दिली भाजपच्या आगामी कार्यक्रमाची माहीती
सेमाना देवस्थान येथे भाजपची टिफिन बैठक
गडचिरोली : -
टिफिन बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी सांगितले की, आपल्या वार्डातील व गावातील विशेष व्यक्ती संपर्क
घर संपर्क, बूथ सशक्तिकरण अभियान तसेच सर्व कार्यकर्त्यां कडून आणि प्रत्येक नागरिकांकडून सरलॲप, नमो ॲप डाऊनलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या. व आतापर्यंत केलेल्या कामाची विचारणा केली तसेच विशेष व्यक्ती संपर्क किती झाला ? प्रत्येक बूथ मध्ये किती घरांशी संपर्क झाला? घरातील किती सदस्यांकडून मिस कॉल केला ? 9090902024 या नंबर वर एकूण मिस कॉल किती झाले? सरलॲप, नमोॲप किती डाऊनलोड केले? नव मतदार नोंदणी व बोगस मतदार याची किती नोंद झाली? घरातील किमान एक नंबर बूथ जनता व्हाट्सअप ग्रुप मध्ये जोडला का ? बूथ मधील घर निहाय सर्व सदस्य यांची पूर्ण नावे मोबाईल नंबर मतदार क्रमांका सह सलग मतदार यादी तयार केली का?
बूथनिहाय किती भिंतीवर कमळ चिन्ह काढले? याची विचारणा कार्यकर्त्यांना केली व केलेली नसल्यास त्याची पूर्तता 22 जुलै पर्यंत करण्यासंबंधी सूचना यावेळी जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांनी दिल्या.
तसेच 23 जुलै रोजी प्रत्येक बुथवर मतदार नोंदणी व दुरुस्ती होणार आहे. तसेच 15 ऑगस्ट 2023 पर्यंत नवीन मतदार नोंदणी करण्यात येत आहे, तेव्हा ही मतदार नोंदणी करून घ्यावी. (बूथ मध्ये किमान 50 नवमतदार नोंदणी करणे अपेक्षित आहे.) बैठकीतील कार्यवाहीचा अहवाल प्रदेश कार्यालयास 17 जुलै पर्यंत bjpmaha@gmail.com या मेल वर पाठवावे. उपस्थित प्रत्येकाने टिफिन बैठकीचा फोटो काढून स्वतःच्या सरलॲप व नमोॲप मध्ये अपलोड केला आहे याची खात्री करावी. याचा कार्यकर्ता निहाय रिपोर्ट विभाग व प्रदेशास लगेच पाठवावा, असे आवाहन यावेळी प्रमोद पिपरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या वतीने १६ जुलै रविवारला दुपारी १ वाजता सेमाना देवस्थान येथे टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,आमदार डॉ.देवरावजी होळी,भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव जी कोहळे,जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे, प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश गेडाम, भाजप महिला मोर्चा च्या जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, संपर्क प्रमुख विलास पा.भांडेकर,माजी पं.स.सभापती विलास दशमुखे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, माजी.न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहर महामंत्री केशव निंबोड,शहर महामंत्री विनोद देओजवार, तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे,धानोरा युवा मोर्चाचे अध्यक्ष सारंग साळवे, शहर उपाध्यक्ष श्रीकांत पतरंगे, जेष्ठ नेत्या प्रतिभाताई चौधरी, महिला मोर्चा च्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहराध्यक्षा कविताताई उरकुडे, अर्चनाताई निंबोड, वैष्णवी नैताम,कोमल बारसागडे, रश्मी बाणमारे, पुष्पाताई करकाडे , ज्योतीताई बागडे, भाजपाचे देवाजी लाटकर, राजू शेरकी,विजय शेडमाके,बंडूभाऊ झाडे,विवेक बैस, प्रा. उराडे सर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी खासदार अशोकजी नेते, आम डॉ. देवरावजी होळी यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
0 Comments