गडचिरोलीच्या भूमितुन मिळालेला विजय प्रेरणादायीच
सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी भेटीदरम्यान केले विशेष कौतुक
गडचिरोली :
गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसने दहा वर्षानंतर आपला गड काबीज केला. काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी भाजपच्या अशोक नेते यांचा दणदणीत पराभव केला. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गडचिरोली जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी त्यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. दरम्यान आज या सर्व मंडळींनी नवी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदिय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीत गडचिरोलीत झालेल्या
विजयाबाबत डॉ किरसान, महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या कामाचे कौतुक केले.पक्षवाढीसाठी अशाच ताकतीने काम करा असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गडचिरोलीत काँग्रेसचा झालेला विजय एका वेगळ्या अर्थाने मोठा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली चे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या विजयासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. पन डॉक्टर किरसान यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामान्यासोबत जुडण्याकरिता केलेले काम, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोलीत विजयासाठी केलेले प्रयत्न,
काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केलेले प्रभावी नियोजन, सातत्याने घेतलेली मेहनत या विजयासाठी काँग्रेस व इंडिया आघडी चे सर्व पदाधिकारी व तळागळातील कार्यकर्ते कारणीभूत ठरली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रा, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्याचे सार्वत्रिक प्रयत्न, कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य जनतेसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राबविलेली चळवळ अतिशय प्रभावी संघठन बांधणी,सामान्यांच्या न्यायहक्कासाठी सत्ताधारी भाजपच्या विरोधात केलेली अनेक आंदोलन, काढलेले मोर्चे सामान्य जनतेच्या मनात घर करून गेली.यामुळं काँग्रेसन आपला गड अधिक भक्कमपणे परत मिळविला.
सोनिया गांधी 2004 मध्ये गडचिरोली येथे आल्या होत्या. आजच्या भेटीत त्यांनी आवर्जून या आठवणीना उजाळा दिला. काँग्रेस संसदिय समितीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गडचिरोली चे खासदार डॉ नामदेव किरसान, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची उपस्थिती होती.
0 Comments