महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हासरचिटणीस पदी सुषमा येवले.

महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हासरचिटणीस पदी सुषमा येवले.


गडचिरोली,
  गडचिरोली जिल्हा महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतिने महीला मेळाव्याचे (हळदीकुंकू)आयोजन चामोर्शी रोड गडचिरोली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालयात पार पडला, यावेळी भाग्यश्री आत्राम (हल्गेकर) राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्षा, शाहीन हकीम महीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी विभागीय अध्यक्षा तथा गडचिरोली जिल्हा महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्षा, सोनाली पुण्यापवार, मिनल चिमुरकर महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली शहर अध्यक्षा, संध्या उईके माजी नगरसेविका, निता बोबाटे महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्षा, आरती कोल्हे चामोर्शी महीला रा का पा  निरीक्षक, ढोलने मॅडम सेवादल जिल्हा मुख्यसंघटिका, प्रमिला रामटेके मागासवर्ग विभाग महीला रा का पा अध्यक्षा, सुवर्णा पवार महीला युवक रा कॉ पा उपाध्यक्षा, आदी मान्यवर उपस्थित होत्या यावेळी मेळाव्यात महीलांचा हळदीकुंकू तथा भेटवस्तूनचे वितरण करण्यात आले. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या महीला कार्यकर्त्या सुषमा येवले यांची गडचिरोली जिल्हा महीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली, ही निवड महीला जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी केली असून, माजी जिप अध्यक्षा भाग्यश्री आत्राम (हल्गेकर) यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. आपल्या नियुक्तीचे श्रेय सुषमा येवले यांनी आदरणीय आमदार धर्मराव बाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, महीला जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गडचिरोली शहर अध्यक्ष विजय गोरडवार, या यु कॉ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर , सेवादल जिल्हाअध्यक्ष अमर खंडारे,या सर्वांना दिले असून, त्यांच्या निवडीबद्दल प्रसाद पवार रायुकॉ जिल्हा उपाध्यक्ष, अमोल कुळमेथे रायुकॉ गडचिरोली शहर अध्यक्ष, उमाताई बनसोड, रेखाताई सहारे, आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments