संघर्षनगर स्नेहनगर येथे भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

संघर्षनगर स्नेहनगर येथे भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते  ध्वजारोहण


गडचिरोली :
      संघर्ष नगर ( स्नेहनगर) येथील प्रभाग क्र 3 मधील भाजप बुथ क्रमांक 81 येथे काल दिनांक 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने  भाजपचे ज्येष्ठ नेते, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

      यावेळी प्रामुख्याने  गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, माजी नप सभापती मुक्तेश्वर काटवे माजी नप सभापती केशव निंबोड, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लताताई लाटकर, नीता उंदिरवाडे, अर्चना निंबोड, कोमल बारसाकडे पुनम हेमके, विलास नैताम, देवाजी लाटकर राकॉचे जिल्हा संघटन सचिव महेश टिपले, विनोद लटारे , संजय बोदलकर देवचंद खैरे, गणेश बोबाटे,गिरीश मुरमुरवार यादव प्रसाद कौशल्य देवेंद्र लाटकर सुनील बनसोड ओमेश हजारे रामभाऊ नैताम, भूषण बांबोडे अरविंद डोंगरे संगीता बोधलकर शिल्पा लटारे सुल्का बोबाटे वेणूताई लाटकर रंजनी खैरे धारा बनसोड कुमारी कौशल्य सुधा बांबोळे तसेच  प्रभाग क्र 3 मधील  नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  यावेळी माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी उपस्थित नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले व अडचणी समस्या प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली. संचालन विनोद लटारे यांनी केले.

Post a Comment

0 Comments