गडचिरोली, धानोरा ,कुरखेडा, एम आय डी सी येथे गेल्या इतक्या वर्षापासून उद्योग न उभारता जागा बळकाऊन बसलेल्या तोतया उद्योजकांवर कारवाई करा
- नगरसेवक आशीष भाऊ पिपरे
चामोर्शी , दिनांक २६ डिसेंबर २०२२ गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेला चामोर्शी तालुक्यातील स्थानिक चामोर्शी व आष्टी येथील एम आय डी सी चा प्रश्न गेल्या इतक्या वर्षापासून प्रलंबित आहे परंतु सदर समस्या गेल्या इतक्या वर्षापासून पर्यंत दुर्लक्षित राहिला आहे,येथील सुशिक्षित बेरोजगार युवक येथे एम आय डी सी स्थापन होईल व इथे नवीन उद्योग स्थापन होईल व रोजगार मिळेल या आशेने पाहत आहेत परंतु येथे एम आय डी सी स्थापन होण्याचे कोणते ही हालचाली नाहीत त्यामुळे येथील बेरोजगारांची राज्य सरकारने दखल घेऊन तत्काळ एम आय डी सी स्थापन करावी तसेच गडचिरोली येथील एम आय डी सी येथे दोन चार उद्योग सुरू आहेत व येथील संपूर्ण जागा रिक्त आहेत व सदर जागेवर उद्योग उभारण्याच्या नावावर फक्त ताबा घेऊन तार कंपाऊंड वॉल करण्यात आले आहे पण उद्योग मात्र सुरू झाले नाही , व काही उद्योजकांनी खाजगी मालमत्ता प्रमाणे उद्योग सुरू न करता येथे उद्योगाच्या नावाखाली घरे बांधली आहेत त्यामुळे नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी इच्छुक उद्योजक यांना जागे अभावी उद्योग स्थापन करता येत नाही व जिल्ह्यातील कुरखेडा व धानोरा
येथे कोणतेच उद्योग स्थापन झाले नाही व येथील एम आय डी सी ओसाड पडली आहे परंतु स्थानिक चामोर्शी आष्टी येथील स्थानिक बेरोजगार युवक येथे एम आय डी सी येथे उद्योग स्थापन करण्यासाठी इच्छुक आहेत तरी राज्य सरकारने उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक युवकांच्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे व स्थानिक चामोर्शी व आष्टी येथे एम आय डी सी स्थापन करण्यात यावे तसेच उद्योग स्थापन करण्याच्या नावावर एम आय डी सी गडचिरोली , कुरखेडा ,धानोरा येथे गेल्या कित्येक वर्षांपासून जागा बळकाऊन बसलेल्या तोतया उद्योजकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी
नगरसेवक आशीष भाऊ पिपरे यांनी केली आहे
0 Comments