सरन्यायाधीश यांच्या वरील हल्ला निंदनीयघटनेचा निषेध!कठोर शिक्षा करासामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांची मागणी

सरन्यायाधीश यांच्या वरील हल्ला निंदनीय
घटनेचा निषेध!
कठोर शिक्षा करा
सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांची मागणी
अहेरी:- सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर सोमवार 6 ऑक्टोबर रोजी राकेश किशोर नामक वकिलाने बूट भिरकाविल्याचे प्रकार निंदनीय असून घटनेचा जाहीर निषेध आहे त्यामुळे जातीवादी, समाजकंटक राकेश किशोर यांच्यावर कठोरातील कठोर शिक्षा  करण्याची तीव्र व एकमुखी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
     देशात लोकशाही व सर्वधर्मसमभावाची झालर असताना असले संतापजनक प्रकार तेही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर झाल्याने हे अत्यंत निंदनीय असून जातीवादी, समाजकंटक राकेश किशोर यांच्यावर तात्काळ कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी सुरेंद्र अलोणे यांनी केले आहे.
      पत्रकात पुढे नमूद केले आहे की, भरकोर्टात तेही चक्क सर्वोच्च न्यायालयातील सर न्यायाधीशावर असले प्रकार होणे म्हणजे शरमेने मान खाली घालणारी चिड व संतापजनक घटना आहे. दस्तुरखुद्द सरन्यायाधीश भुषण गवई यांनी संयमाचा बांध सोडला नसला तरी, भावना दुःखावल्या असून समाज कंटक वकील राकेश किशोर यांच्यावर कठोर शिक्षा करून त्याचे लायसन्स बडतर्फ करावे अशीही मागणी सुरेंद्र अलोणे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments