भामरागड मध्ये क्रीडाउत्सव; राजे धर्मराव ज्युनिअर कॉलेज विजेते

भामरागड मध्ये क्रीडाउत्सव; राजे धर्मराव ज्युनिअर कॉलेज विजेते
भामरागड,
राजे विश्वेश्वर राव कला वाणिज्य महाविद्यालय, भामरागड यांच्या वतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा आज सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेचे आयोजन दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता करण्यात आले होते.
या स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विशाल तावेडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत राजे धर्मराव ज्युनिअर कॉलेज, जय परसापेन विज्ञान महाविद्यालय तसेच साई कॉलेज यांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धा नॉकआउट पद्धतीने घेण्यात आली.
अंतिम निकालानुसार राजे धम्मरामराव ज्युनिअर कॉलेज यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला. जय परसापेन विज्ञान महाविद्यालय यांनी द्वितीय, तर साई कॉलेज यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सर्व सामन्यांमध्ये खेळाडूंनी शिस्त, संघभावना व क्रीडावृत्तीचे उत्तम दर्शन घडविले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, शारीरिक शिक्षण विभाग तसेच स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या व सहभागी संघांचे अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments