शिक्षक मतदार संघाचे उमेदवार नागो गाणार यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य करा - भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री, नगरसेवक आशीष पिपरे

शिक्षक मतदार संघाचे उमेदवार नागो गाणार यांना निवडून आणण्यासाठी सहकार्य करा -
भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री, नगरसेवक आशीष पिपरे.
भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट.


गडचिरोली,
शिक्षक मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी समर्थीत उमेदवार मा. आमदार नागोजी गाणार यांना येत्या निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी तमाम जिल्ह्यातील शिक्षक मतदार बांधवांनी सहकार्य करावे असे जाहीर आवाहन भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री नगरसेवक आशीष पिपरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील समस्त शिक्षक मतदार बांधवांना केले
नागो गाणार यांनी नेहमीच शिक्षकांच्या मागण्यांसाठी पुढाकार घेऊन विधानसभेत आवाज उठवलेला आहे. त्यांनी शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच भूमिका मांडलेली आहे. व आजपर्यंत शिक्षकांचा न्याय व हक्कासाठी अविरत कार्य केला आहे अशा उमेदवाराला सहकार्य केल्यास निश्चितच तमाम जिल्हावासिय शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागतील .त्यामुळे आपणही आपल्या समविचारी शिक्षकांच्या माध्यमातून मतदानाच्या रूपाने नक्कीच सहकार्य करावे अशी विनंती व जाहीर आवाहन भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा गडचिरोलीचे वतीने जील्हावासिय शिक्षक मतदार यांना केली. यावेळी प्रामुख्याने
शिक्षक मतदार संघाचे उमेदवार नागोजी गाणार यांच्या प्रचारार्थ गडचिरोली नगरीत आलेले भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांना नियोजन बद्ध पद्धतीने या निवडणुकीत कार्य करण्याच्या सूचना दिल्या या वेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार गडचिरोली जिल्हा निवडणूक प्रमुख अशोक नेते ,आ ,देवराव होळी, भाजपा जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे अनुसुचित जाती जमाती आघाडी प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम ,भाजप नेते बाबुरावजी कोहळे सदानंद कुथे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments