भारतीय कम्युनिस्ट पार्टी आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुक स्वबळावर लढविणारपत्रकार परिषदेत डॉ महेश कोपुलवार यांची माहिती


भारतीय कम्युनिस्ट पार्टी आरमोरी नगर परिषदेच्या निवडणुक स्वबळावर लढविणार
पत्रकार परिषदेत डॉ महेश कोपुलवार यांची माहिती
आरमोरी,
आगामी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका २०२५ मध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी आरमोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह संपुर्ण १० वार्डात आपले उमेदवार उभे करून संपुर्ण जागा स्वबळावर लढविणार आहे. असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा तथा भाकपा चे मंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव डॉ महेश कोपुलवार यांनी माहीती दिली. पत्रकार परिषदेत संबोधतांना डॉ कोपुलवार म्हणाले की, आम्ही गोरगरीब जनतेसाठी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झटलो. आणि आमचे काम सुरूच राहणार आहेत. आरमोरी शहरात सन २०१० मध्ये आरमोरी ग्रामपंचायत असतांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सरपंच होती. त्यांनतर आरमोरी जिल्हा परिषद क्षेत्रातून सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जागा निवडून आलेली होती. त्यानंतर सुद्धा सन २०१९ च्या निवडणूकीत आरमोरी शहरवासियांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कोणत्याही प्रलोभनाची अपेक्षा न करता भरघोस मतदान केलेले आहे. मागील सन २०१९ च्या नगर परिषदेच्या निवडणूकीत भाजपाचा नगराध्यक्ष तसेच भाजपाला बहुमत मिळाल्यामुळे त्यांनी मनमानी कारभार चालविला, परंतू जनतेच्या हितासाठी कोणतेही काम केले नाही. तत्कालीन काळात केंद्रात व राज्यात सत्ता असतांना व आरमोरी विधानसभेचा भाजपाचा आमदार व खासदार असतांना सुद्धा नगर परिषदेच्या सत्तेत बसलेल्या भाजपावाल्यांनी आरमोरीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला नाही, लोकांचे घरांचे
कर अनेक पटींनी वाढविले, प्रत्येक दाखल्याकरिता लागणारी रक्कम वाढविली व जनतेची लुट केली. हे सर्व आरमोरी शहरवासियांना माहिती आहे. म्हणून यावेळी भारतीय कम्युनिस्ट पश्चाने आरमोरी नगर परिषदेच्या संपुर्ण जागा स्वबळावर लढण्याचा निर्धार केलेला आहे. योग्य उमेदवारांचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिकीट देणार आहे. त्याकरिता दि. ०९/११/२०२५ रोज रविवारला कॉ. डॉ. महेश कोपुलवार हयांचे जूना बसस्टँड आरमोरी स्थित दवाखान्यात ईच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तरी ईच्छूक उमेदवारांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे उमेदवारी मिळण्याकरिता अर्ज करावा व दि. ०९/११/२०२५ रोजी होणाऱ्या मुलाखतीकरिता आपल्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. तसेच समविचारी पक्ष आणि संघटना आगामी निवडणुकीत आमच्या सोबत येत असल्यास आम्ही त्यांचे स्वागत करू असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. पत्रकार परिषदेला भा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव मंडळ सदस्य कॉ. डॉक्टर महेश कोपुलवार यांच्या सोबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव कॉ. एड. जगदीश मेश्राम, तालुका सचिव प्रकाश खोब्रागडे, शहर सचिव संजय वाकडे, जिल्हा कोषाध्यक्ष का. मीनाक्षी शेलोकर ज्येष्ठ नेते काँ. चंद्रभान मेश्राम, का. ऋषी रामटेके उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments