माजी राज्यमंत्री व माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अमरीशराव आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त एटापल्ली भाजपकडून फळवाटप उपक्रम
एटापल्ली,
दिनांक १५ ऑक्टोबर रोजी, भारतीय जनता पार्टी तालुका शाखा एटापल्ली तर्फे माजी राज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अमरीशराव आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नेतृत्व भाजपा जिल्हा गडचिरोलीचे सचिव श्री मोहनजी नामेवार यांनी केले.
कार्यक्रमास शहर व ग्रामीण भागातील अनेक भाजपा कार्यकर्ते, महिला मोर्चा व युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी रुग्णांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अमरीशराव आत्राम यांच्या दीर्घायुष्य व यशस्वी सार्वजनिक कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी “सेवा हीच आमची ओळख” या भावनेतून समाजसेवा व जनहिताची कार्ये सतत सुरू ठेवण्याचा संकल्प केला.
या सेवा उपक्रमामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा उपक्रम समाजसेवेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.

0 Comments