गडचिरोली तालुक्यातील रानखेडा येथे हनुमान व माता मंदिरांचे बांधकाम भूमिपूजन

गडचिरोली तालुक्यातील  रानखेडा येथे  हनुमान व माता मंदिरांचे बांधकाम भूमिपूजन

 जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजन 



गडचिरोली,

 गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रानखेडा येथील नागरिकांचे श्रध्दास्थान असलेल्या हनुमान मंदिर व माता मंदिरांच्या बांधकामाची मनोकामना लवकरच पुर्णत्वास येणार आहे. रानखेडा येथे माता मंदिराचे बांधकाम उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या पुढाकाराने आणि गावातील नागरिकांच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहे. या बांधकामाचे भूमिपूजन शिवसेना उध्दव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

 मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील रानखेडा येथे उघड्या जागेत भाविकांचे श्रध्दास्थान असलेले माराई मातेची गेल्या अनेक वर्षापासून भक्तीभावाने पुजा अर्चना केली जाते. देवस्थानला छत नसल्याने पावसाचे पाणी मातेच्या मुर्तीवर पडते. तसेच पुजाविधीच्या वेळी गावातील भाविक भक्तांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेता गावकऱ्यांनी लोकसहभागातून मंदिराचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंद कात्रटवार यांनी सुध्दा माता मंदिराच्या बांधकामासाठी पुढाकार घेतला. त्याच बरोबर रानखेडा येथे  हनुमान मंदिराचे बांधकाम होणार आहे. त्यामुळे मंदिर बांधकामाला गती आली असून अरविंद  कात्रटवार यांच्या हस्ते नुकतेच माता मंदिर व हनुमान मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. रानखेडा येथे माता मंदिर व हनुमान मंदिरांच्या बांधकामाचे भूमिपुजन पार पडल्याने मंदिर उभारण्याची भाविक-भक्ताची मनोकामना लवकच पुर्णत्वास येणार आहे. 

 मौशीखांब -  मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही अरविंद कात्रटवार यांनी याप्रसंगी दिली. नागरिकांनी सुध्दा गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन सहकार्य करावे असे आवाहनही केले. 
 भूमिपुजन कार्यक्रमाला रानखेडा येथील यादवजी लोहंबरे, गणेश दहलकर, संदिप भुरसे, कैलास आवारी, लोभाजी झाडे, डंबाजी तिवाडे, दिपक पानसे, सुर्यभान झाडे, संदिप तिवाडे, हरिश्चंद्र घुबडे, माधव चौधरी, पंढरी माकोडे, हरिश्चंद्र मडावी, पुरुषोत्तम गजपूरे, केजु मडावी, कुंदन पानसे, निंबाजी तिवाडे, मनोहर ठाकरे, प्रज्वल झाडे, हर्षल दहलकर, अनिकेत मडावी, भुषण दहलकर, पियुष म्हशाखेत्री, संतोष रोहणकर, वैभव दहलकर, भाष्कर रोहणकर आदि नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments