राज्यस्तरीय लोहार समाज शिक्षण महर्षी पुरस्काराने सन्मानित -  सुरेश मांडवगडे
गडचिरोली ,
        महाराष्ट्र राज्य सकल लोहार समाजाच्या वतीने अक्षदा मंगल कार्यालय चिंचोली (माळी) रोड, केज जि. बीड (मराठवाडा) येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय लोहार समाज कार्यकर्ता एकत्रीकरण मेळावा, अखिल लोहार गाडीलोहार समाज विकास संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सन्माननीय संदीप ज्ञानेश्वर थोरात साहेब बारामती यांचे अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. साहेबराव पोपळघट जालना यांचे शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक दत्तात्रय अंकुशे साहेब, प्रमुख पाहुणे म्हणून सकल लोहार समाज फलटणचे अध्यक्ष हनुमंतराव चव्हाण, वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूरचे सचिव सुरेश मांडवगडे, ठाणेचे प्रसिद्ध सिनेमा एक्टर कृष्णकांत खरे, माढ्याचे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कळसाईत, वाशिमचे सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डॉक्टर नागोराव थोरात, एलवायएफचे महाराष्ट्र प्रमुख किशोर प्रकाश सोनवणे, पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवक किसनराव बल्लांसे, गाडीलोहार धर्मशाळा आळंदीचे अध्यक्ष दिलीप थोरात, सामाजिक कार्यकर्ते सागर लोहार, नयनाताई हरिहर आदी मान्यवर उपस्थित होते. 
        लोहार समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अवस्था फारच हलाखीची असतानाही समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात बोटावर मोजण्या इतपत फक्त चार-पाच समाज बांधवांनी शैक्षणिक संस्था उघडून विद्यादानाचे कार्य करीत आहेत. ही लोहार समाजासाठी भूषणावह बाब आहे. महाराष्ट्रात अत्यंत दुर्गम, अविकसित, नक्षलग्रस्त भागातील गडचिरोली जिल्ह्यात गणपुर रयतवारी ता.चामोर्शी येथे अनुदानित लोकमान्य टिळक विद्यालय चालवून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळवून देऊन सेवाकरीत असल्याबद्दल सुरेश मांडवगडे गडचिरोली यांना लोहार समाज शिक्षण महर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन श्री विलास आव्हाड, अनंत आनेराव, बब्रुवान नवघन, मारुती नवघन, आश्रुबा आनेराव, चंद्रकांत कळसाईत, विठ्ठल आनेराव, सदानंद आव्हाड, अतुल लोहार, अशोक गेंदले, मुकुंद अंकुशे, अनंत गवळी यांनी केले.

0 Comments