शितल सोमनानी यांनी रुग्णाला रक्त मिळवून देण्यासाठी समाजसेवेचे तत्पर - रक्तदान हेच श्रेष्ठ दान
गडचिरोली : "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" म्हणून रक्ताची गरज असल्याची जाणीव होताच रुग्णाच्या नातेवाईकांनी गडचिरोली येथील महिला रुग्णालयात रुग्णास (पेसेंटला) रक्ताची अत्यावश्यक गरज असल्याची माहिती समाज सेविका शीतलताई सोमनानी यांना प्राप्त झाली. त्यामुळे त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असं म्हणत तात्काळ प्रतिसाद देत त्यांनी संबंधित रुग्णाशी संपर्क साधला. आणि समाज सेविका शीतलताई सोमनानी व शोभाताई सोमनानी, स्वप्नील पोगुलवार, संचित येनगंटिवार, अर्पित दुधबावरे, प्रमोद सातार, अभिषेक गुरनुले, संकेत कुनघाडकर व इतर कार्यकर्ते यांनी रुग्णालयात जाऊन तातडीने मदतकार्य केले. सदर महिला रुग्णालयात शितलताई आणि त्यांची टीम दाखल होत परिस्थितीची पाहणी करून वैद्यकीय अधिकारी व रुग्णा महिले सोबत चर्चा करण्यात
आली. आणि संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांना धीर देत त्यांना आधार दिला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे रक्ताचा प्रश्न मार्गी लागला व रुग्णास आवश्यक ती मदत वेळत मिळाली. या कर्तव्यदक्ष आणि संवेदनशील कार्यामुळे समाजात शितलताई सोमनानी यांच्या समाजसेवेच्या कार्याची प्रशंसा होत आहे.

0 Comments