अवैधरित्या विक्री करीता साठवणूक केलेल्या देशी मद्याच्या 730 बॉक्स सह एक चारचाकी वाहन गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यातएकूण 73,40,000/- रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त


अवैधरित्या विक्री करीता साठवणूक केलेल्या देशी मद्याच्या 730 बॉक्स  सह एक चारचाकी वाहन गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात

एकूण 73,40,000/- रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त
गडचिरोली,
              गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असताना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी अवैध दारु विक्री करणा­यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन आज दिनांक 01/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पथकाने पोस्टे अहेरी हद्दीतील मौजा मद्दीगुडम येथे धाड टाकून अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई केलेली आहे.
              सविस्तर वृत्त असे आहे की, आज दिनांक 01/10/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीच्या अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पोस्टे अहेरी हद्दीतील मौजा मद्दीगुडम, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील काही इसमांनी अवैधरित्या विक्रीकरीता देशी दारुची साठवणूक करुन ठेवलेली आहे. अशा मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पोलीस पथकाने दोन पंचासमक्ष सदर ठिकाणी धाड टाकली असता, घटनास्थळावर अवैध देशी दारु विक्रीकरीता घेऊन जाण्यासाठी एक महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनात भरुन ठेवली असल्याचे मिळून आले. यावेळी पोलीस पथकाने आरोपी नामे मिथुन विश्वास मडावी, वय 35 वर्षे, रा. आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली यास अवैध देशी दारुने भरलेल्या वाहनासह ताब्यात घेतले आहे. मात्र दरम्यान पोलीस पथक आल्याचा सुगावा लागल्याने इतर तीन आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. सदर तिनही आरोपींचा शोध सुरु असून आरोपी नामे मिथुन विश्वास मडावी, वय 35 वर्षे, रा. आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली याचे सह एकूण 730 नग अवैध देशी दारुचे बॉक्स, किंमत अंदाजे 58,40,000/- रु. व एक चारचाकी महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन क्र. एम एच 34 सीडी 8410 किंमत अंदाजे 15,00,000/- रु. असा एकूण 73,40,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. 
          संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे अहेरी येथे अप क्र. 306/2025 कलम 65 (ए), 65 (ई), 83, 98 (2) महा.दा.का. अन्वये आरोपी नामे मिथुन विश्वास मडावी, वय 35 वर्षे, रा. आलापल्ली, ता. अहेरी, जि. गडचिरोली व इतर तीन फरार आरोपी यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी नामे मिथुन विश्वास मडावी यास अटक करण्याची प्रक्रिया सुरु असून इतर फरार आरोपींचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे अहेरी येथील सपोनि. देवेंद्र पटले करीत आहेत.
          सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि. भगतसिंग दुलत, पोअं/राजु पंचफुलीवार व चापोअं/दिपक लोणारे यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments