एटापल्ली येथे आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद - समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ एटापल्लीचा पुढाकार

एटापल्ली येथे आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद - 
समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था आणि श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ एटापल्लीचा पुढाकार
शशांक नामेवार तालुका   प्रतिनिधी
एटापल्ली : 
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य वर्धिनी केंद्र, समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्था व श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियानांतर्गत दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी मंगळवार ला प्रभाग क्र. १० येथील गायत्री शारदा उत्सव मंडळाच्या मंडपात आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शिबिरात एकूण ४० नागरिकांनी आपापल्या आरोग्य तपासण्या करून घेतल्या. मधुमेह,रक्तदाब,सीबीसी (संपूर्ण रक्त तपासणी) थायरॉईड प्रोफाईल,सिकल सेल,मलेरिया रॅपिड टेस्ट,डेंग्यू,कोलेस्टेरॉल व लिपिड प्रोफाईल,यकृत कार्य (LFT) व मूत्रपिंड कार्य (KFT) अशा महत्त्वपूर्ण चाचण्या करण्यात आल्या.
शिबिराचे उद्घाटन प्रभागातील ज्येष्ठ महिला श्रीमती सुनंदा नामेवार यांच्या हस्ते झाले.या उपक्रमास तालुका वैद्यकीय अधिकारी भूषण चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी डॉ.गायत्री शहारे आरोग्य वर्धिनी केंद्र,नामदेव हिचामी पाणीपुरवठा सभापती नगरपंचायत एटापल्ली,समर्पण सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राघवेंद्र सुल्वावार, उपाध्यक्ष राहुल कुळमेथे,सचिव अमोल गजाडीवार,कोषाध्यक्ष सुरज मंडल,सदस्य संतोष गंदेशिरवार,रोहित बोमकंटीवार, अंकित दिकोंडावार उपस्थित होते.तसेच गायत्री शारदा उत्सव मंडळाच्या पूजा पुल्लूरवार, सुरेखा मूलकावार,ललिता बल्लेवार,रेखा हमंद,ज्योती डोमलवार यांच्यासह श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळाचे पंकज पत्तीवार,सुमित नाडमवार,अनिकेत मामीडवार, शशांक नामेवार व आरोग्य वर्धिनी केंद्राचे कर्मचारीही सहभागी झाले.
या उपक्रमामुळे नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य तपासण्या गावातच सुलभपणे उपलब्ध झाल्या.शिबिराचे सर्वत्र कौतुक होत असून अशा आरोग्य उपक्रमांची सातत्याने गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments