भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे व माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते गडचिरोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांचा सत्कार

भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे व माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांच्या हस्ते गडचिरोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांचा सत्कार


गडचिरोली :- 

    जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर प्रमोद खंडाते हे नुकतेच रुजू झाले त्याबद्दल भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे व भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी तथा गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे यांनी त्यांची भेट घेतली व गडचिरोली जिल्ह्यात रुजू झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तथा शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
    यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्व नागरिक व रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी परिश्रम घेणार असल्याचे सांगितले.
  याप्रसंगी भाजपच्या महिला आघाडी च्या जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, ज्येष्ठ कार्यकर्त्या वच्छलाबाई मुनघाटे, शहर अध्यक्ष कविता उरकुडे, पुष्पाताई करकाडे उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments