जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्यासाठी पक्षसंघटन मजबूत करा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा सभेत माजी मंत्री आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे आवाहन
आरमोरी :- गडचिरोली
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी पक्षसंघटन मजबूत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री तथा अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या आढावा सभेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आढावा सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी कृषी सभापती नाना नाकाडे, प्रदेश सरचिटणीस मोहम्मद युनूस शेख, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मोटवानी, शैलेश पोटुवार, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष आरिफ पटेल, जिल्हा सचिव कपिल बागडे, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष किशोर तलमले, सह अध्यक्ष सुनील नंदनवार, जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या कल्पना तिजारे, महिला
महायुती होईलच याच्या भरोशावर राहु नका - आ. आत्राम
पुढे मार्गदर्शन करताना आ. धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने संधी मिळते. आपला पक्ष महायुती सरकारमध्ये सामील आहे. परंतु जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती होईलच या भरोशावर न राहता निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागावे असेही ते म्हणाले.
जिल्हा कार्याध्यक्षा रुषाली भोयर, आकाश मडावी, देसाईगंज तालुका अध्यक्ष संजय साळवे, तालुका कार्याध्यक्ष मनोज तलमले, कुरखेडा तालुका अध्यक्ष राम लांजेवार, तालुका कार्याध्यक्ष बौद्धकुमार लोणारे, कोरची तालुका अध्यक्ष क्रांती केरामी, आरमोरी शहर अध्यक्ष प्रदिप हजारे, महिला आरमोरी तालुका अध्यक्ष संगीता मेश्राम, शहर महिला अध्यक्ष जयश्री भोयर
मंचावर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, माजी कृषी सभापती नाना नाकाडे, प्रदेश सरचिटणीस मोहम्मद युनूस शेख यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
यावेळी आढावा सभेला आरमोरी तालुका सरचिटणीस रामदास दहिकर, राकेश बेहरे, सुनील बांगरे, पितांबर लांजेवार,
रमेश पगाडे, सुरेंद्र बावनकर, प्रशांत मोगरे, नरेश हिरापुरे, श्रीधर पोटेकर, सोनू साखरे, उद्धव दिघोरे, मनोज बनपूरकर, योगेश थोराक, सलमान कासमानी विनोद गेडाम, अभिमन्यू हजारे, --भूमिका बागडे, शुभांगी गराडे, डिम्पल ढोरे, गीता रॉय, रजनी निंबेकर, वामन नींदेकर, कुरखेडा शहर कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मडावी, दिलाराम मानकर, आसाराम कुरंजेकर, युवराज मरसकोल्हे, देवा गिरडकर, प्रभाकर जुमनाके, गिरीधर राऊत किरपाल सयाम, शोभा तुलावी, जास्वंदा गावळे, किशोर दखने, विक्की देशमुख, कोरची तालुक्यातील योगेश चौधरी, योगेश धनगाये, रोहिदास मडावी, पूनमचंद लाडे, नंदकिशोर मोरे, द्रौपदी सुखदेवे, अश्विनी खुणे, रवि दुमाने यांच्यासह आरमोरी विधानसभा क्षेत्रातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आढावा सभेचे संचालन व प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र सहअध्यक्ष सुनील नंदनवार तर आभार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष किशोर तलमले यांनी मानले.
0 Comments