राजीव गांधी हायस्कुल, एटापल्ली येथील 5 विद्यार्थ्यांचा सन्मान.
नगर पंचायत प्रशासन ही पारितोषाची रोखरक्कम देण्यास 7 महिने का उशीर केले याबाबत प्रश्नचिन्ह
एटापल्ली,
स्थानिक नगर पंचायत, एटापल्ली अंतर्गत माहे डिसेंबर 2024 मध्ये विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धा घेण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धा, टाकाऊ वस्तू पासून टीकाऊ वस्तू , वॉल पेंटिंग असे अनेक विषयावर स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये राजीव गांधी हायस्कूल एटापल्ली, जिल्हा परिषद हायस्कूल, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील बरेच आदिवासी, गैर आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.
यामध्ये राजीव गांधी हायस्कूल एटापल्ली येथील 5 वी ते 7 वी गटातील चित्रकला स्पर्धेत द्वितीय व तृतीय तसेच 5 ते 10 वी गटातील टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ या स्पर्धेत प्रथम आणि तृतीय तसेच वॉल पेंटिंग या स्पर्धेत प्रथम असे एकूण 5 विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले.
परंतु नगर पंचायत प्रशासन यांनी 7 महिने ओलांडून देखील सदर विद्यार्थ्यांना पारितोषिक ची रक्कम देण्यास हलगर्जीपणा करीत होते. याबाबत श्रीकांत कोकुलवार सर (माजी तालुका अध्यक्ष, रा.काँ.पा.) यांनी यापूर्वी नगर पंचायत च्या अधिकाऱ्यांना साधारणतः तीन वेळा पारितोषिक बाबत विचारणा केले पण त्यांच्याकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत होते.
15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्रदिना निमित्ताने नगर पंचायत प्रशासन सर्व अधिकाऱ्यांना वेठीस धरले आणि पारितोषिक रक्कम ची विचारणा केली आणि त्यांना पत्रकार परिषद घेऊन आपण वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी विनंती केले की सर असे काहीच करू नका आम्हाला 20 ऑगस्ट पर्यंत वेळ द्या तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पारितोषिकाची रोखरक्कम देऊ..
त्यानुसार आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी नगर पंचायत एटापल्ली येथे नगराध्यक्षा, मुख्यकार्यकारी अधिकारी, सर्व नगरसेवक यांच्या उपस्थित सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना पारितोषिकाची रक्कम देण्यात आली.
यामध्ये राजीव गांधी हायस्कूल येतील विद्यार्थी नाव
स्पर्धा क्र .1 (चित्रकला स्पर्धा)
कु. गंगा फुलचंद ठाकूर वर्ग 7 वी, द्वितीय क्रमांक, रोखरक्कम -- 1000/
कु. सानिया अशोक चांदेकर वर्ग 7 वी, तृतीय क्रमांक, रोखरक्कम -- 700/
स्पर्धा क्र. 2 (टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ)
सोहम सर्जित कविराज वर्ग 6 वी, प्रथम क्रमांक, रोखरक्कम 5000/
प्रेम निरंजन शर्मा वर्ग 7 वी, तृतीय क्रमांक, रोखरक्कम 2000/
स्पर्धा क्र. 3 (वॉल पेंटिंग)
कु. सानिया सर्जित कविराज वर्ग 9 वी, प्रथम क्र. रोखरक्कम 3000/
असे एकूण राजीव गांधी हायस्कूल एटापल्ली येथील 5 विद्यार्थ्यांना 11,700/- रोखरक्कम पारितोषिक प्राप्त झाले.
यानिमित्ताने जिल्हा परिषद हायस्कूल, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथील विद्यार्थ्यांना सुद्धा रोखरक्कम पारितोषिक अंदाजित सर्व प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे 35000/- प्राप्त झाले.
रोखरक्कम पारितोषिक मुळे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसून आले. व वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी उत्साह वाढले.
नगर पंचायत प्रशासन ही पारितोषाची रोखरक्कम देण्यास 7 महिने का उशीर केले याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
0 Comments