जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा. - नामदार अजितदादा पवार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागा. - नामदार अजितदादा पवार
गडचिरोली,
       येणाऱ्या काळात लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने कामाला लागा. असे आवाहन राष्ट्रवादी चे राष्ट्रीय अध्यक्ष व लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. 
       ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नागपूर येथील विभागीय कार्यालयात गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मंचावर माजी मंत्री आमदार राजकुमार बडोले, आमदार राजू कारेमोरे, माजी आमदार व नागपूर विभागीय निरीक्षक राजेंद्र जैन, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी आमदार रामकृष्ण मडावी उपस्थित होते.
         पुढे मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार म्हणाले की राजकीय जीवनात काम करताना
वैयक्तिक कामाला महत्व न देता सार्वजनिक कामाला महत्व देणे खूप महत्वाचे आहे. नागपूर विभागातील कार्यकर्त्यांना जनतेचे काम करण्यासाठी मुंबईला येणे अवघड आहे. त्यासाठी नागपूर येथील विजयगड या माझ्या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री कार्यालय जनतेच्या सेवेसाठी सुरु असून त्याठिकाणी स्विय सहाय्यक व कर्मचारी उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात येऊन जनसेवेचे कार्य करावे. असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले.
        राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पक्षसंघटनेची स्थिती आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुका या विषयावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर आपली भूमिका अवगत केली.
    या आढावा बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस युनूस शेख, प्रदेश संघटन सचिव लौकिक भिवापूरे,जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, फहीम काझी, सुरेंद्र अलोणे, दिलीप मोटवानी, अयुब शेख, शैलेश पोटुवार, अल्पसंख्यांक प्रदेश सरचिटणीस नजमुद्दीन शेख, सचिव मुश्ताक शेख,  अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, आरमोरी विधानसभा अध्यक्ष किशोर तलमले सहअध्यक्ष सुनील नंदनवार, जिल्हा महिला कार्याध्यक्ष सुषमा येवले, युवती जिल्हा उपाध्यक्ष मोहिनी वरखडे, सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष संदीप बेलखेडे,  जिल्हा अध्यक्ष आरिफ पटेल, सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रदिप वडेट्टीवार, सोशिएल मीडिया जिल्हा अध्यक्ष अक्षय बोरकर,  धानोरा तालुका अध्यक्ष सरफराज शेख, अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, भामरागड तालुका अध्यक्ष इंदरशाह मडावी, देसाईगंज तालुका अध्यक्ष संजय साळवे, गडचिरोली शहर अध्यक्ष अमोल कुळमेथे, देसाईगंज शहर अध्यक्ष लतीफ शेख,  आरमोरी तालुका सरचिटणीस रामदास दहिकर, किसान आघाडी आरमोरी तालुका अध्यक्ष हरिराम मातेरे, सेवादल आरमोरी तालुका अध्यक्ष सुनील बांगरे, युवा नेते आकाश मडावी, युवक आरमोरी तालुका अध्यक्ष शाम सपाटे, मोहित राऊत, आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments