माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची भाजप राज्यपरिषद सदस्यपदी निवड
गडचिरोली
भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने आज राज्य परिषदेवरील ४५४ सदस्यांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये गडचिरोलीच्या भूमीतून जनतेच्या सेवेसाठी समर्पित असलेले, भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची राज्यपरिषद सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याचे अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद ठरले आहे.
सामाजिक बांधिलकी, पक्षनिष्ठा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणाऱ्या डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची प्रामाणिक पावती म्हणता येईल. गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जनतेशी अत्यंत आत्मीयतेने जोडले गेलेले त्यांचे नेतृत्व नव्या जबाबदारीसह अधिक व्यापक पातळीवर काम करेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. या नव्या नियुक्तीबद्दल डॉ. अशोकजी नेते यांचे हार्दिक अभिनंदन केले! तसेच भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदेमध्ये स्थान मिळवलेल्या मा, उपेंद्रजी कोठेकर,माजी राज्यमंत्री अंबरीशराव महाराज आत्राम, माजी आमदार कृष्णा भाऊ गजबे सर्व नवनियुक्त सदस्यांनाही राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ, भारत खटी व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी त्यांच्या निवासस्थान कार्यालयात शुभेच्छा दिले !
0 Comments