राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची शोभाताई फडणवीसांशी चर्चा
गडचिरोली : माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्यासोबत डॉ. खुणे.
गडचिरोली,
नाम फाउंडेशन आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची मूल येथे नुकतीच सदिच्छा भेट घेत त्यांच्याशी पाणी प्रश्नावर चर्चा केली.
नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या सहकायनि गडचिरोली जिल्ह्यात विविध तालुक्यांत ५० तलावांचे गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत खोलीकरण केले जाणार आहे. यासंदर्भात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, नाम फाउंडेशनचे विदर्भ समन्वयक उमेश पाटील व राष्ट्रीय मानवाधिकार
संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, प्रकाश थुल यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली व तलाव खोलीकरणावर चर्चा केली. तसेच चामोर्शी तालुक्यातील इतर समस्यांवरही शोभाताई फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली.
0 Comments