मरारटोला येथे भेट : आमदार कृष्णा गजबे यांनी वृद्ध लोकांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले

मरारटोला येथे भेट : आमदार कृष्णा गजबे यांनी वृद्ध लोकांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले

 



 
गडचिरोली,
आज, १० नोव्हेंबर २०२४ रोजी, आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार आमदार कृष्णा दामाजी गजबे यांनी मरारटोला येथील नागरिकांशी भेट घेतली. यावेळी, त्यांनी गावातील वृद्ध नागरिकांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतले आणि त्यांना आपल्या वचनबद्धतेचे आश्वासन दिले.

आमदार कृष्णा गजबे यांनी या भेटीदरम्यान गावातील नागरिकांना आपल्या कुटुंबाचे सदस्य मानले आणि "आई काकाजी व ताई" म्हणून हाका दिले. यावर नागरिकांनीही त्यांना "दादा बाळा" म्हणून प्रेमाने संबोधले. ही घडणारी संवाद शैली दर्शवते की, आमदार कृष्णा गजबे यांचं गावातील नागरिकांशी असं प्रेमळ नाते आहे, ज्यामुळे त्यांना असं वाटतं की "आपलाच बाळ, आपलाच भाऊ, आपल्याच परिवारातला एक सदस्य आमदार झाला आहे."

या भेटीदरम्यान, कृष्णा गजबे यांनी गावातील लोकांच्या समस्यांवर चर्चा केली आणि त्यांच्या निराकरणासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments