गडचिरोली विधानसभा भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभचे आयोजन
चामोर्शी,
भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी. नगराध्यक्ष न. प.गडचिरोली सौ. योगिताताई प्रमोद पिपरे यांच्या नेतृत्वात वागधरा, मुरखळा चक येथे सभेचे आयोजन करण्यात आले
या सभेला
गडचिरोली जिल्हा महामंत्री तथा माजी.नगराध्यक्ष न.प.गडचिरोली सौ.योगीताताई प्रमोद पिपरे,यांनी सर्वाना मार्गदर्शन करताना सांगितले कि,देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंदजी मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंदजी फडणवीस साहेब,मा.श्री.अजित दादा पवार साहेब यांनी महिलांना सक्षमि करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत उदा.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जे महिलांना १५०० रुपये मिळत होते ते पुढे भाजपा - महायुती चे सरकार आली तर २१०० रुपये महिना केले जाणार ,बेटी पढाव बेटी बचाव,उज्वल गॅस योजना,हर घर शौचालय योजना, घरकुल योजना,महिलांना बस प्रवास अर्ध तिकीट, सुकन्या योजना,असे अनेक योजनाचा लाभ महिलांना मिळत असून,अनेक महिलांना लखपती दीदी करण्याचे ठरवले आहे.
यावेळी आदिवासी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ. चंदाताई कोडवते,जिल्हा सचिव श्री दिलीप चलाख,भाजपा जेष्ठ नेत्या श्रीमती. प्रतिभाताई चौधरी,तालुका उपाध्यक्ष श्री.राजेश्वर चौधरी,तालुका महामंत्री श्री. संजय खेडेकर, आर. पी. आय. चे नेते श्री. चंद्रपाल कोटांगले, गडचिरोली शहर अध्यक्ष सौ. कविता उरकुडे, शहर उपाध्यक्ष सौ.भावना हजारे, शहर उपाध्यक्ष मंदाताई मांडवगडे,माजी. नगर सेविका सौ.लताताई लाटकर,भाजपा VJNT शहर अध्यक्ष पूनमताई हेमके,सौ. स्वातीताई चंदनखेडे तसेच सर्व कार्यकर्ते, परिसरातील व गावातील मतदार बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते
0 Comments