काँग्रेसने सतत डॉ बाबासाहेबांच्या संविधानाचा व आरक्षणाचा कायमच विरोध केला. इंजि. प्रमोदजी पिपरे

 काँग्रेसने सतत डॉ बाबासाहेबांच्या संविधानाचा व आरक्षणाचा कायमच विरोध केला. इंजि. प्रमोदजी पिपरे

भारतीय जनता पार्टी गडचिरोली च्या वतीने काळी फित बांधुन राहुल गांधी यांचा जाहीर निषेध


गडचिरोली:-

       पंडित नेहरू,इंदिरा गांधी पासून ते राहुल गांधी पर्यंत काँग्रेसी नेत्यांनी कायमचं संविधान व आरक्षणन  विरोधी भूमिका घेतलेली आहे.राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास पुन्हा एकदा SC,ST,OBC समाजाचा आरक्षण रद्द करू असे म्हटले आहे.काँग्रेसची ही संविधान व आरक्षण  विषयी भूमिका देशासाठी  घातक  आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  संविधानाचा व आणि त्यांनी दिलेल्या आरक्षणाचा सतत काँगेसनी नेहमीच विरोध केलेला आहे.असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा निवडणुक प्रमुख इंजि.प्रमोदजी पिपरे यांनी केले.
    स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचा नेतृत्वात राहुल गांधीच्या  विरोधात काळी फित बांधून राहुन गांधी मुर्दाबाद असा नारा देत राहुल गांधीचा जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
    यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ योगीताताई पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा,किसान आघाडी प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर मिलिंदजी नरोटे,डॉ.चंदाताई कोडवते.जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,तालुका अध्यक्ष विलास पाटील भांडेकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे,युवा मोर्चा अध्यक्ष अनिल तिडके,युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकरराव भांडेकर,महिला आघाडी शहर अध्यक्ष कविता उरकुडे,वैष्णवी नैताम भाजपा पदाधिकारी, बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments