तळागळातील लोकांची सेवा करण्याचे काम प्रत्येकांना लाभत नाही- आमदार कृष्णा गजबे
युवा मित्र गणेश मंडळ पोटगावच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न...
देसाईगंज:- देसाईगंज तालुक्याच्या पोटगाव येथील युवा मित्र गणेश मंडळाच्या वतीने आज १३ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवा गोपाल काल्यानिमित गावामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोफत आरोग्य शिबीरास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. सदर आरोग्य शिबिरात नेल्सन हॉस्पिटल नागपूर, सृष्टी डोळ्यांचा दवाखाना यांच्या मार्फत तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे मोफत बी पी, शुगर, डोळ्यांची तपासणी,मोफत चष्मे वाटप, इसिजी व इतर आरोग्य तपासणी करण्यात आली.
तळागळातील लोकांची सेवा करण्याचे काम प्रत्येकांना लाभत नाही. मात्र, सध्या स्थितीत गणरायाला साकडे घालून नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे; यासाठी युवा मित्र गणेश मंडळ पोटगाव यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करून एकप्रकारे नवसंजीवनीचे कार्य केले आहे. गणेश मंडळाने आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर वाखाणण्याजोगे आहे. सर्वांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मी सुध्दा अष्टविनायकाच्या चरणी प्रार्थना करून सर्वांना सुख-समृद्धी लाभो; असे शिबिराप्रसंगी आमदार कृष्णा गजबे बोलत होते.
यावेळी सदर शिबिरास आमदार कृष्णा गजबे, कार्यक्रमाचे उद्घाटक माजी पंचायत सदस्य शिवाजी राऊत, अध्यक्ष म्हणून p गावचे प्रतिष्ठित नागरिक दूधराम हरडे, प्रमुख अतिथी डॉ.सुनील पुंडके, पोटगाव ग्रा.पं.सरपंच विजय दडमल, उपसरपंच पंकज वंजारी, तंटामुक्त समिती अध्यक्ष चंदू रणदिवे, महेंद्र सोनपिपरे, किरण बनसोड, शंकर रणदिवे, डॉ.सोनल जोशी, गायत्री सोनकुसरे, कृष्णा वरखडे, भूमिका नीमजे व ग्रामस्थ उपस्थित होते.
नेल्सन हॉस्पिटल नागपूरचे डॉ.मोहित ठाकरे,डॉ.दीक्षा जुंबळे,डॉ.प्रणय पचगडे, डॉ.नितेश टिकले सह नेल्सन हॉस्पिटल नागपूरचे आरोग्य कर्मचारी,डॉ.सुनील कुडके, सचिन निमजे,भूमिका नीमजे यांनी आरोग्य शिबिराची धुरा सांभाळली होती.
0 Comments