माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली मेडपल्ली येथील विविध पक्षातील अनेक युवकांचा पक्ष प्रवेश.!


माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या नेतृत्वाखाली मेडपल्ली येथील विविध पक्षातील अनेक युवकांचा पक्ष प्रवेश.!



अहेरी:- विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षातील युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश करत आहेत.

फंक्शन हॉल येथे पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या नेतृत्वात अहेरी तालुक्यातील मेडपल्ली गावातील युवा कार्यकर्ते यांनी आलापल्लीचे राजे समर्थक श्रीनिवास नामनवार यांचा पुढाकाराने मोठ्या संख्येने पक्ष प्रवेश केला.
त्यावेळी राजे साहेबांनी त्यांच्या गळ्यात दुपट्टा टाकून स्वागत केले व सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.मेडपल्ली येथील युवा कार्यकर्ते शैलेश जॅकेवार,प्रकाश तलांडे,अक्षय सडमेक,प्रणित कोडापे,शंकर तलांडे,राजू पेंदाम,साहिल मडावी,जिवनदास पेंदाम,ध्रुव कोडापे,अनिरुद्ध पेंदाम,प्रवीण मेश्राम अशा अनेकांनी यावेळी प्रवेश केला.

यावेळी अहेरी तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते तथा राजे समर्थक उपस्थित होते.!

Post a Comment

0 Comments